दैनिक राशि-भविष्य, १७ डिसेंबर २०२१; ‘या’ राशीच्या लोकांना जुन्या आजारातून मुक्ती मिळेल. डॉक्टरांकडून येणारा आरोग्य अहवाल पॉझिटिव्ह येईल.

  मेष (Aries):

  सामाजिक मेळावे आणि नातेवाईकांच्या भेटीतून तुम्हाला खूप आनंद मिळेल. तुम्ही नोकरी बदलण्याच्या शोधात असाल तर तुम्हाला ही संधी मिळू शकते. नवीन काम सुरु करताना स्पर्धा असेल. सर्व व्यावसायिकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील, गेल्या आठवड्यात रखडलेली कामेही या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. तथापि, काही लोकांना कौटुंबिक जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा वडिलांशी मतभेद होऊ शकतात. आज ८०% नशिबाची साथ आहे. पिवळे कपडे घालून घराबाहेर पडा.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  वृषभ (Taurus):

  तुमच्यापैकी काहींना अनेक क्षेत्रांत चमकण्याची संधी आहे. महत्त्वाकांक्षी उपक्रमांमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. व्यवसाय विस्ताराच्या योजना आखल्या जातील. तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज हवे असल्यास तेही तुम्हाला उपलब्ध होईल. लाभ स्थानी असलेला चंद्र तुम्हाला विविध स्त्रोतांकडून लाभ देऊ शकतो. कौटुंबिक जीवनातही चांगला वेळ घालवू शकाल. आज ९०% नशिबाची साथ आहे. शनिदेवाची स्तुती करा. तुम्ही एखादे वाहन वगैरे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यालाही आज मूर्त रूप मिळू शकते.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  मिथुन (Gemini):

  आर्थिक परिणाम अपेक्षेपेक्षा कमी असू शकतात. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. विचारपूर्वक गुंतवणूक करणे उचित ठरेल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद असल्यास तो सामंजस्याने सोडवा. आज तुम्हाला खर्चावर विशेष लक्ष द्यावे लागेल. चंद्र तुमच्या बाराव्या स्थानी आहे, त्यामुळे अनावश्यक खर्च होऊ शकतो. या दिवशी व्यवहार करणे टाळा आणि बजेटनुसार जास्तीत जास्त पैसे खर्च करा. आध्यात्मिक क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  कर्क (Cancer):

  तुम्हाला वारंवार डोकेदुखी आणि इतर काही आजारांचा त्रास होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराची तब्येतही बिघडू शकते. तुम्हाला इजा होण्याचा धोका असल्याने वाहन चालवताना काळजी घ्या. अथक परिश्रमाने प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांची मने जिंकू शकता. या राशीचे काही लोक आज आपल्या जोडीदाराला चांगली भेट देऊ शकतात, ज्यामुळे वैवाहिक जीवनात संतुलन निर्माण होईल. आज ८५% नशिबाची साथ आहे. गुरुच्या बीज मंत्राचा जप करा. आज लहान भावंडांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  सिंह (Leo):

  कायदेशीरबाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्ही संकटात सापडू शकता. रिअल इस्टेटचे व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. धार्मिक कार्यात खर्च होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमच्या बोलण्यात गोडवा असेल. या राशीचे काही लोक सामाजिक स्तरावर चांगली छाप पाडू शकतात. राजकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी दिवस चांगला राहील. आज वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होऊ शकते. आज ८८% नशिबाची साथ आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  कन्या (Virgo):

  तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल आणि आरोग्याबद्दल अधिक उत्सुक असाल आणि योग्य लोकांशी सल्लामसलत कराल. भरपूर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस कमी होऊ शकतो. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून दिवस शुभ आहे. भावंडांच्या मदतीने करिअर क्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील. या राशीचे लोक जे साहसी काम करतात त्यांनाही या दिवशी चांगले फळ मिळू शकते. धैर्य वाढू शकते. आज ८२% नशिबाची साथ आहे. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  तूळ (Libra):

  नशीब तुमच्या बाजूने आहे, परंतु वाहन चालवताना काळजी घ्या आणि अपघात टाळा. शक्य असल्यास रात्री गाडी चालवू नका. तुम्ही अनेक गोष्टींवर पैसे खर्च करु शकता, काळजी घ्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. जुन्या आजारातून मुक्ती मिळेल. डॉक्टरांकडून येणारा आरोग्य अहवाल पॉझिटिव्ह येईल. आईच्या तब्येतीत आज चांगले बदल होतील. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आज ७५% नशिबाची साथ आहे. बहीण किंवा मावशीला भेटवस्तू द्या.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  वृश्चिक (Scorpio):

  तुमचे संवाद कौशल्य सर्वकाळ उच्च आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन उपक्रमासाठी हा उत्तम काळ आहे. तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असाल. तुमची जीवनशैली सुधारेल. शेजारील मुलीसोबत शारीरिक संबंध जोडण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. सेक्स संबंधाच्या गुपित गोष्टी कुठेही उघड करू नका. या राशीच्या लोकांसाठी देखील दिवस चांगला जाईल जे प्रेमात आहेत. ते आपल्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतील, ज्यामुळे तुम्हाला सामाजिक स्तरावर देखील चांगले परिणाम मिळतील. आज ८५% नशिबाची साथ आहे. शिक्षकांचा आदर करा.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  धनु (Sagittarius):

  चालू असलेल्या प्रकल्प आणि कामांमध्ये अडथळे संभवतात. कोणताही वाद किंवा भांडण टाळा. गुंतवणूक पुढे ढकलणे चांगले. कोणताही मालमत्तेचा सौदा निश्चित करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा अन्यथा नुकसान होऊ शकते. आज चंद्र तुमच्या राशीतून सहाव्या स्थानी असेल, त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा ज्यांच्या बोलण्यातून नकारात्मकता दिसून येते. या राशीच्या लोकांनाही आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, योगसाधना केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात, त्यामुळे योगाला जीवनात स्थान द्या. आज ६७% नशिबाची साथ आहे. आईचा आशीर्वाद घ्या.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  मकर (Capricorn):

  योजना पूर्णतः अंमलात आणल्या जाऊ शकतात आणि ते तुम्हाला फायदेशीर परिणाम देतील. पगारदार लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य कौतुक आणि आदर मिळू शकतो. तुमच्या सप्तम स्थानी चंद्रा संचार करेल ज्यामुळे भागीदारी व्यवसायात चांगले फळ मिळू शकेल. काही लोकांना या दिवशी काही शुभ कार्याच्या संदर्भात आपल्या जोडीदारासोबत नातेवाईकाच्या घरी जाण्याची संधी मिळू शकते. आज ८२% नशिबाची साथ आहे. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या आवडीची वस्त भेट द्या.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  कुंभ (Aquarius):

  तुमच्या स्वभावासा मुरड घाला. व्यावसायिक निर्णय परिस्थितीनुसार घ्या अन्यता संधी गमावली जाईल. शैक्षणिक स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. ज्यांना पैशाशी संबंधित धोका पत्करावा लागेल ते थोडे सावध राहतील,. आज कर्ज घेणे आणि देणे टाळा. तथापि, आठव्या स्थानी बसलेला चंद्र या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ देऊ शकतो. काही वाईट बातमी तुमचे मन दुखवू शकते. आज ६६% नशिबाची साथ आहे. पांढऱ्या वस्तू दान करा.
  शुभ रंग आणि अंक : नारंगी, 7

  मीन (Pisces):

  साहित्य, कला, लेखन, संगीत, चित्रपट किंवा क्रीडा यांसारख्या सर्जनशील क्षेत्रांशी निगडित लोकांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. नवव्या स्थानी चंद्राचा संचार असेल, त्यामुळे अध्यात्मिक विषयात रस वाढेल. या राशीच्या काही लोकांना आज शैक्षणिक क्षेत्रातही चांगले परिणाम मिळू शकतात. काही लोकं धार्मिक प्रवासाला जाण्याचा विचार करू शकतात. आज ९२% नशिबाची साथ आहे. गरजूंना वस्तू दान करा.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3