
मेष (Aries):
आज कोणालाही उधार देणं टाळा. व्यवसाय आणि पैश्यांसाठी दिवस सामान्य आहे. विद्यार्थी आभ्यासात चांगलं प्रदर्शन करतील. पोटाचे विकार जाणवतील. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5
वृषभ (Taurus):
यश चांगली प्रतिष्ठा मिळेल. आज पदोन्नतीशी संबंधित चर्चा होईल. मुलांच्या कामाचा अभिमान वाटेल. मित्र परिवाराकडून योग्य साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण असेल.
शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1
मिथुन (Gemini):
कुटुंबामध्ये आज वातावरण प्रसन्न असेल. चांगलं कार्य तुमच्या हातून पार पडेल. ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं होईल. अडकलेले पैसे मिळतील. शिवाय अचानक धनलाभ होण्याचे देखील योग आहेत. गुंतवणूक होईल.
शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2
कर्क (Cancer):
दुसऱ्यासोबत चांगला व्यवहार करा. कामासाठी बाहेर जाण्याचे योग आहेत. गुंतवणूक करण्यासाठी आज योग्य दिवस आहे. पॉलिसी किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6
सिंह (Leo):
दुसऱ्यासोबत चांगला व्यवहार करा. कामाच्या ठिकाणी आडचणी येतील. खरे-खोटे आरोप देखील तुमच्यावर होवू शकतात. चांगल्या लोकांसोबत ओळख होईल. ज्यांच्यामुळे तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल.
शुभ रंग आणि अंक : केशरी, 6
कन्या (Virgo):
जुन्या गोष्टीमुळे सहकार्यासोबत वाद होवू शकतात. त्यामुळे सावध राहा. वाद करणं टाळा. खासगी आयुष्यात देखील काही अडचणी येवू शकतात. जोडीदाराला समजून घेतल्यास वाद टळू शकतील.
शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6
तूळ (Libra):
चातुर्याने काम करा, यश नक्की मिळेल. प्रमाणापेक्षा जास्त राग आडचणी वाढवेल. मुलांमुळे आनंद मिळेल. कोणतही काम करण्यापूर्वी वरिष्ठाचा सल्ला नक्की घ्या. मैत्रिणीसोबत सिनेमा पाहण्याचा बेत आखू शकतात. मुलींकडून मैत्रीचे ऑफर येतील.
शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4
वृश्चिक (Scorpio):
आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मित्रांसोबत वाद होतील. पण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. मुले खेळ आणि इतर मैदानी कामांवर जास्त वेळ देतील.
शुभ रंग आणि अंक : केशरी, ३
धनु (Sagittarius):
स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. दिवस चांगला आहे.
शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3
मकर (Capricorn):
आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. दिवस लवकरच बदलतील. चांगल्या व्यक्तींसोबत भेटी होतील. भविष्याकडे वाटचाल करा. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.
शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4
कुंभ (Aquarius):
सर्वत्र तुमची चर्चा असेल. अधिक प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल.
शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3
मीन (Pisces):
अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कार्यक्षेत्रात थोडी चूक झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. प्रेमसंबंध चांगले झाले तर तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज भासणार नाही.
शुभ रंग आणि अंक : लाल, 7