थरारक हत्याकांड; सासरी जाण्याऱ्या नवरीवर झाडल्या गोळ्या

सांपला गावातून या वधूला लग्न करून वराच्या कुटुंबीयांनी आणले होते. घरी पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोरांनी गावाबाहेर ही घटना घडवून आणली.

    हरयाणा. भर लग्नात सासरी जाणाऱ्या नवरीवर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली. यादरम्यान हल्लेखोरांनी आधी वरातीच्या गाडीला ओव्हरटेक केले. त्यानंतर वराला खाली उतरवल्यानंतर वधूवर तीन वेळा गोळ्या झाडल्या. ही थरारक घटना रोहतक जिल्ह्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

    भर वरातीत हत्याकांड
    सांपला गावातून या वधूला लग्न करून वराच्या कुटुंबीयांनी आणले होते. घरी पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोरांनी गावाबाहेर ही घटना घडवून आणली. दरम्यान वधूची प्रकृती चिंताजनक आहे. घटना घडल्यानंतर हवेत गोळीबार करीत हल्लेखोर तेथून पळून गेले. वरातीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांत एकच खळबळ उडाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले.

    वधूला उपचारासाठी पीजीआयमध्ये नेण्यात आले, जिथे तिची प्रकृती चिंताजनक आहे. तपासात असे आढळून आले आहे की, हल्लेखोरांमध्ये एक आरोपी साहिल (रा. खेडी, सांपला) म्हणजेच वधूच्या गावचा राहणारा आहे. सध्या पोलिसांनी साहिल या आरोपीसह अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.