मनकवड्या बागेश्वर महाराजांची संपत्ती किती आहे? महिन्याला किती कमावतात?, एका प्रवचनाचे किती पैसे घेतात?

बागेश्वर महाराज नागपूर येथे प्रवचन करण्यासाठी आले असता त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आरोप केला होता

  दुसऱ्याच्या मनातील प्रश्न अचूक ओळखून त्यावर समाधान सांगणारे बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहे. बागेश्वर बाबा अंधश्रद्धा पसवरतात असा आरोप आता करण्यात येत आहे. तरीही आरोपांना न  घाबकच बागेश्वर बाबांचे प्रवचन सुरु आहेत. मात्र, दुसरीकडे सोशल मिडियावर लोक बागेश्वर महाराजांबदद्ल जाणून घेताना दिसत आहेत. धीरेंद्र शास्त्री कोण आहेत? त्यांची कौटुंबिक पार्श्वभुमी कशी आहे ? त्यांची संपत्ती किती आहे? याबद्दल जाणून घ्या.

  कोण आहेत बागेश्वर धाम?

  बाबा बागेश्वर म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांच वय अवघे २६ वर्षे आहे. त्यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर गार्हा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव सरोज गर्ग आहे. त्यांचे वडील रामकृपाल गर्ग गावातच सत्यनारायणाची कथावाचन करत होते. तर कधी कधी धीरेंद्र शास्त्रीही वडिलांसोबत कथा सांगण्ययास जात होते. त्यांच्या घरी दुध विक्रीचा व्यवसाय आहे. धीरेंद्र कृष्ण यांनी  इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण घेतले. वडिलांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी कथा वाचन करण्यास सुरुवात केल्याचाृ त्यांनी सांगितसं,

  धीरेंद्र शास्त्रींची संपत्ती किती?

  धीरेंद्र शास्त्री यांची दर महिन्याची कमाई जवळपास ३.५ लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती झी न्यूजने दिली आहे. ते एक कथा किंवा प्रवचन सांगण्यासाठी ८ हजार रुपये घेतात. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची नेटवर्थ ९ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. परंतु शास्त्री यांचं म्हणणं आहे की, ते या पैशांचा वापर भुकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी करतात. तसेच ते एक गोशाळा देखील चालवतात..

  वाद नेमका काय?

  बागेश्वर महाराज नागपूर येथे प्रवचन करण्यासाठी आले असता त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आरोप केला होता तसेच यांच्या चमत्कारिक शक्तीं सिध्द करण्याच आव्हान दिलं होतं. अन्यथा त्यांच्याविरुद्ध पोलीस एफआयआर दाखल करण्यात येईल, असंही समितीने म्हटलं होतं. त्यांनतर ते कथा कार्यक्रम पुर्ण होण्यापुर्वीच तिथून निघून गेले होते. तेव्हापासून ते वादात आले आहेत.