Citizens are forcibly confined to a closed iron cage on suspicion of being a Corona patient. Imprisonment in 2 crore civilian homes

चीनमध्ये शहरात एक कोरोना संक्रमित रुग्ण मिळाला, तर संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. ज्या जनतेला घरात डांबून ठेवण्यात येणार आहे, त्यांचे काय, हा साधा विचारही राज्यकर्त्यांनी केला नाही. हॉस्पिटल्समध्ये कोरोना संक्रमित रुग्णांशिवाय इतर कोणत्याही आजाराच्या रुग्णांनां उपचार मिळेनासे झाले आहेत(Huge persecution in China under the guise of lockdown! Pregnant women lose children, many starve, patients die on hospital steps).

  वॉशिंग्टन : चीनमध्ये शहरात एक कोरोना संक्रमित रुग्ण मिळाला, तर संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. ज्या जनतेला घरात डांबून ठेवण्यात येणार आहे, त्यांचे काय, हा साधा विचारही राज्यकर्त्यांनी केला नाही. हॉस्पिटल्समध्ये कोरोना संक्रमित रुग्णांशिवाय इतर कोणत्याही आजाराच्या रुग्णांनां उपचार मिळेनासे झाले आहेत(Huge persecution in China under the guise of lockdown! Pregnant women lose children, many starve, patients die on hospital steps).

  कुणाला ह्रद्यविकाराचा झटका आला, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, त्यांना उपचार मिळालेच नाहीत. हॉस्पिटलच्या पायऱ्यांवरच त्या व्यक्तीने प्राण सोडले. गर्भवती मिहलेला प्रसुतीकळा आल्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये गेली, तर तिला दाखलच करुन घेण्यात आले नाही. गर्भातच तिच्या अर्भकाचा मृत्यू झाला. कठोर बंधने असल्याने, घरात अन्नधान्याच्या टंचाईमुळे अनेकांचे घरातच भूकबळी पडत आहेत. हे वास्तव चित्र आहे सध्याच्या चीनचे.

  जीवघेणी झीरो कोविड पॉलिसी

  शियान शहरातील लॉकडून जीवघेणा ठरतो आहे. कोरोना चालेल, पण लॉकडाऊन नको, अशा मानसकितेत नागरिक आले आहेत. या ठिकाणी एका व्यक्तीच्या छातीत दुखू लागल्याने तो हॉस्पिटलमध्ये गेला, तर त्याला दाखल करुन घेण्यास हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी नकार दिला. हॉस्पिटलच्या दरवाजातच त्याने प्राण सोडले. तो राहत होता तो परिसर, कोरोनाचा मीडियम रिस्क परिसर असल्याने त्याला प्राणाला मुकावे लागले. एक महिना ८ महिन्यांची ग्रभवती होती. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिची कोविड टेस्ट योग्य नसल्याचे सांगण्यात आले. दाखल करुन घेतले नाही, बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. अशा अनेक कहाण्या आहेत.

  भुकेलेल्यांना रोटीच्या जागी काठी

  लॉकडाऊनमध्ये एका उपाशी तरुणाने लॉकडाऊनचे नियम मोडले. तो रस्त्यावर आला आणि पोलिसांकडे त्याने अन्नाची मागणी केली. त्या बदल्यात पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून हीच परिस्थिती आहे. शियानमध्ये १ कोटी ३० लाख नागरिक घरात बंद आहेत. बहुतांश नागरिकांच्या घरात पुरेसे अन्न नाही. लहान मुलांना दूधही मिळत नाहीये, वयस्कर व्यक्तींना औषधेही नाहीयेत.

  जिनपिंग यांच्या हट्टाने नागरिकांचे हाल

  चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या अट्टाहासामुळे झीरो कोविड पॉलिसीची अमंलबजावणी सुरु आहे. यात जेवढे कठोर होता होईल, तितकी कठोर उपाययोजना सुरु आहे. नागरिक भूकेने किंवा इतर समस्यांनी मेले तरी चालतील, पण कोरोना अटोक्यात येणे गरेजे आहे, ही भूमिका आहे. या कठोर निर्बंधांसाठी हजारो कर्मचारी रस्त्यांवर तैनात करण्यात आलेले आहेत. प्रश्न विचारण्याचा अधिकार तिथे आधी कुणावाच नव्हता, आता तर निर्बंधात याचा प्रश्नच येत नाहीये. वुहान आणि शियानमधून नागरिकांना होत असलेल्या त्रासांच्या बातम्या समोर येतायेत, सरकार मात्र कोरोना नियंत्रणात असल्याचे सांगत, स्वताची पाठ थोपटून घेत आहे.

  ही हुकुमशाही नाही तर दुसरे काय आहे

  ज्या मुलीच्या वडिलांचा मृत्यू ह्द्यविकाराच्या झटक्याने हॉस्पिटलच्या दरवाजावर झाला, तिने सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट लिहिली, तर तिचे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. आता कोरोनासोडून इतर आजारांनी नागरिकांचे मृत्यू होऊ लागले आहेत. याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेल्यांचे, आवाज सरकारकडून दाबण्यात येत आहेत. ९५ टक्के नागरिकांचे दोन्ही लसीकरण झालेले असतानाही, आता श्वास कोंडून मरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

  नागरिक प्रचंड चिडलेले आहेत, कर्मचारी सांगतायेत की त्यांच्यासमोरही पर्याय नाही. त्यांना नेमून दिलेले काम करावेच लागते आहे. रस्त्यावर अन्नाच्या शोधात निघणाऱ्यांना पकडून जेलमध्ये कैद करण्यात येते आहे. इंटरनेटवर कठोरपणे लक्ष दिले जाते आहे. जगाला चीनमध्ये सर्व काही आलबेल आहे, असा संदेश देण्यासाठी हे सारं काही सुरु आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022