डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून नवऱ्याकडून बायकोचा निर्घृण खून

घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास विटाळा वार्डात घडली. रेखा नारायण खराबे वय ३५असे मृत महिलेचे नाव आहे.

    यवतमाळ (Yavatmal) : घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास विटाळा वार्डात घडली. रेखा नारायण खराबे वय ३५असे मृत महिलेचे नाव आहे.

    नारायण यादवराव खराबे वय ४० असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नारायण खराबे आणि पत्नी रेखाबाई यांच्यात शुक्रवारी रात्री अंदाजे ८ वाजताच्या सुमारास घरगुती किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पती नारायणे रागाच्या भरात पत्नीच्या डोक्‍यात कुर्‍हाडीने वार केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना नारायण तेथून प्रसार झाला.

    नंतर नागरिकांनी माहिती कळताच घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेखाला येथील एका खाजगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु ,डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यामुळे तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास शहर पोलिस करीत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.