डोक्याला ताप! विमानात एयर होस्टेस भडकते तेव्हा, मी काही तुमची नोकर नाही..प्रवाशाला खणखणीत सुनावलं, पाहा VIDEO

एअरलाइन्सच्या इस्तंबूल-दिल्ली फ्लाइटमध्ये घडलेल्या या घटनेवर इंडिगोने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

    इंडिगो एअरलाईन्सच्या (Indigo Airlines) एका प्रवासी (Passenger) आणि क्रू मेंबर्समध्ये (Crew Members) झालेल्या वादाचा (Dispute) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Video Viral On Social Media). ज्या व्यक्तीने ही क्लिप शूट केली आणि ट्विटरवर पोस्ट केली त्यानुसार, ही घटना एअरलाइन्सच्या इस्तंबूल-दिल्ली फ्लाइटमध्ये जेवणावरून घडली. त्यावर प्रतिक्रिया देताना, विमान कंपनीने सांगितले की प्रवाशाने विमानात असभ्य वर्तन केलं आणि एअरहोस्टेसपैकी एकीचा अपमान केला, त्यानंतर क्रू लीडरला याप्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. एका निवेदनात, एअरलाइनने म्हटले आहे की ते या घटनेकडे लक्ष देत आहेत आणि आश्वासन दिले की “ग्राहकांच्या सेवेला नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे”.

    त्याच्या १९ डिसेंबरच्या ट्विटमध्ये, युजर गुरप्रीत सिंग हंस म्हणाले की, त्यांनी “दुर्दैवाने” इंडिगो फ्लाइटचे तिकीट बुक केले.

    “प्रत्येक आंतरराष्ट्रीय उड्डाण आम्ही व्यवस्थित करू शकतो (आम्ही दुबई ते भारत ही व्यवस्था करू शकतो) फ्लाइटमध्ये सीट्सच्या समोर खाद्य निवडींचा व्हिडिओ असतो पण यात ती सोय नव्हती. काही लोक व्यवस्था करू शकतात परंतु काही करू शकत नाहीत, त्यांना जेवणाची निवड करणे गरजेचे वाटते ,” असंही हंस यांनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    तो पुढे म्हणाला, “मला माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहे की एक माणूस मुलीसोबत कसा वागतो आणि एक महिला स्टाफशी कशी वागते,” असेही त्यांनी पुढे नमूद केलं.

    सोबतच्या व्हिडिओमध्ये एअरहोस्टेस आणि एक प्रवासी (जो दिसत नाही) यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. क्रू मेंबरने प्रवासी कर्मचार्‍यांशी कठोरपणे बोलल्याचा आरोप केला, यामुळे त्यांच्यापैकी एकाला रडूच कोसळलं.

    एअरहोस्टेस त्या माणसाला म्हणते, “तू माझ्याकडे बोट दाखवत आहेस आणि माझ्याकडे पाहून ओरडत आहेस. माझा क्रू तुझ्यामुळे रडत आहे. कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा, तिथे एक गाडी आहे आणि मोजलेले जेवणच (विमानात)घेतलं आहे. आम्ही फक्त सर्व्ह करू शकतो. तुमचे बोर्डिंग काय आहे…”

    पण तिचं पूर्ण होण्याआधीच प्रवासी परत तिच्यावरच खेकसतो, “तू का ओरडतोस?” “कारण तू आमच्यावर ओरडत आहेस,” एअरहोस्टेसने त्याला आवाज वाढवत उत्तर दिले.

    तिचा सहकारी हस्तक्षेप करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो पण प्रवासी आणि एअरहोस्टेस एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहतात.

    “मला माफ करा पण तुम्ही क्रूशी असे बोलू शकत नाही. मी शांतपणे तुमचे ऐकत आहे, पण तुम्ही क्रूचाही आदर केला पाहिजे,” असे ती प्रवाशाला सांगताना दिसत आहे.

    तो प्रवासी विचारतो, “मी कुठे क्रूचा अनादर केला?” ज्याकडे एअरहोस्टेस पुन्हा बोट दाखवत हायलाइट करते. “चुप राहा,” तो माणूस म्हणतो. “तू गप्प बस,” एअरहोस्टेस उत्तर देते की मी काही तुमची नोकर नाही कंपनीची कर्मचारी आहे आणि तो तिच्याशी असे बोलू शकत नाही.

    मग भांडण अचानक संपते आणि एअरहोस्टेसचा सहकारी तिला विमानाच्या मागच्या बाजूला घेऊन जातो.

    दरम्यान, इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे: “आम्हाला १६ डिसेंबर २०२२ रोजी इस्तंबूल ते दिल्ली या फ्लाइट 6E 12 मध्ये घडलेल्या घटनेची माहिती आहे. हा मुद्दा कोडशेअर कनेक्शनद्वारे प्रवास करणाऱ्या ठराविक प्रवाशांनी निवडलेल्या जेवणाशी संबंधित होता. इंडिगो आपल्या ग्राहकांच्या गरजांची जाणीव आहे आणि आमच्या ग्राहकांना विनम्र आणि त्रासमुक्त अनुभव प्रदान करण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. आम्ही या घटनेचा शोध घेत आहोत आणि आम्ही खात्री देऊ इच्छितो की ग्राहकांच्या सोईला नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. नेहमी सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

    एअरलाइनने म्हटलं की प्रवाशाने सँडविच मागितले आणि क्रूने त्याला सांगितले की ते फ्लाइटमध्ये खाद्यपदार्थ उपलब्ध आहे की नाही ते तपासतील. मात्र त्या व्यक्तीने एअरहोस्टेसवर आरडाओरडा सुरू केल्याने ती रडू लागली.

    मात्र, हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. काही युजर्सनी इंडिगो क्रू सदस्यांना मेहनती म्हटले, तर काही युजर्स म्हणाले की त्यांनी क्रू मेंबर्सची वाढत चाललेली अगतिक प्रवृत्ती पाहिली आहे.

    “माझ्या तीन अलीकडील प्रवासात @IndiGo6E क्रू अगतिक होण्याचा ट्रेंड मी पाहिला आहे, अगदी मूलभूत प्रश्नांची उत्तरे देताना किंवा T3 दिल्लीच्या वेडेपणात वाट पाहिल्यानंतर माझीच होणारी चिडचिड मी रोखू शकलो नाही. ग्राहकांनी विनम्र असणे आवश्यक आहे, परंतु सेवा प्रदात्यांनी देखील संवेदनशील असणे आवश्यक आहे आणि अगतिक नसायला हवं!” असं एका युजरने म्हटलं आहे.

    “या एअर होस्टेस नेहमीच हसतमुख आणि मोकळ्या मनाने खूप मेहनत करतात. जर ती प्रवाशाला ओरडत असेल तर याचा अर्थ काहीतरी मोठे घडले असावे,” दुसरी म्हणाली.