माझा धनशक्ती समोर टिकाव लागू शकलेला नाही : काका कुडाळकर

धनशक्ती पुढे माझा टिकाव लागू शकलेला नाही मात्र यापुढे खचून न जाता जोमाने येणार्‍या काळातल्या निवडणुकांना सामोरे जाऊ घराघरात राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह पोहोचवू, असा विश्वास काका कुडाळकर यांनी व्यक्त केला.

    सिंधुदुर्ग : मी राष्ट्रवादी पक्षातर्फे कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत निवडणूक लढलो मात्र माझा धनशक्ती समोर टिकाव लागू शकलेला नाही माझा या निवडणुकीत झालेला पराभव ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचे सांगत येत्या आठ दिवसात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संघटक हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी दिली.

    आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काका कुडाळकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, उपाध्यक्ष सुनील भोगटे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक, तसेच सेक्रेटरी भास्कर जाधव अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

    धनशक्ती पुढे माझा टिकाव लागू शकलेला नाही मात्र यापुढे खचून न जाता जोमाने येणार्‍या काळातल्या निवडणुकांना सामोरे जाऊ घराघरात राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह पोहोचवू, असा विश्वास यावेळी काका कुडाळकर यांनी व्यक्त केला.