मी कोणावरही टीका केली नाही, मुलींनी साडी नेसण्याबद्दलच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

न्यूज चॅनलमधील मुलींनी साडी नेसण्यावरून झालेल्या वादावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या की, “माझं भाषण सुरू होण्यापूर्वी तिथे एक व्यापक चर्चा सुरू होती. त्या चर्चेला उद्देशून मी अनेक मुद्दे मांडले.

    पिंपरी-चिंचवड : न्यूज चॅनलमधील पत्रकार मुलींनी साडी नेसण्यावरुन वक्तव्य केल्यानं खासदार राजकीय वर्तुळातुन सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांच्यावर टिका होत आहे. भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही टीका करत त्यांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. या टीकेवर आता सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या भाषणात मी कोणावरही टीका केली नाही. मी फक्त माझं मत मांडलं. असं त्यांनी म्हण्टलं आहे.

    काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

    पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या ४३व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना  सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत?. त्या नेहमी शर्ट आणि ट्राऊझरच का घालतात? चॅनेलमध्ये या मुली मराठीतून बोलतात, मराठी संस्कृतीवर गप्पा मारतात. मात्र, महाराष्ट्राची पारंपारिक वेशभूषा करत नाहीत. त्यांच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपनेही त्यांच्यावर निशाणा साधला होता.

    वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण

    न्यूज चॅनलमधील मुलींनी साडी नेसण्यावरून झालेल्या वादावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या की, “माझं भाषण सुरू होण्यापूर्वी तिथे एक व्यापक चर्चा सुरू होती. त्या चर्चेला उद्देशून मी अनेक मुद्दे मांडले. यावेळी मी कोणावरही टीका केली नाही. मी फक्त माझं मत मांडलं. कोणी काय घालावे, हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे, हे सुद्धा म्हटले होते. त्यामुळे ते भाषण सर्वांनी पूर्ण ऐकावे. माझं ३५ मिनिटांचे जर भाषण १७ सेकंदमध्ये दाखवण्यात येत असेल तर त्यावर काय बोलणार” , असं त्या म्हणाल्या.