मी कोणत्याही प्रश्नावर प्रतिक्रिया देणार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून इतर आरक्षणाला कोणताच धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण, ते उच्च न्यायालयात टिकले नाही.

  पिंपरी : प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांचा एकत्रित असलेला फोटो, सुप्रिया सुळे भावनिक, गोपीचंद पडळकर यांनी केलेल्याटिकेवर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असं स्पष्ट व्यक्तव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी येथे केले. झोपडपट्टी पुनर्वसनप्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या ६७० झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळपासूनच शहरात दौरा सुरु केला होता. यावेळी पत्रकारांनी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांचाएकत्रित असलेला फोटो आणि त्यावरून सुरू असलेल्या चर्चां, खूप ते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सुप्रिया सुळे भावनिक झाल्याच्या प्रश्नआणि गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टिकेवरही त्यांनी मी प्रतिक्रिया देणार नाही असं स्पष्ट केलं.

  मुस्लिम आरक्षणासंदर्भात सकारात्मक असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरकोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही त्या पद्धतीने कायदेशीर तोडगा काढावा लागेल असे ते म्हणाले. आज-काल वाचाळवीरांची संख्या वाढली असल्याचे टीका त्यांनी केली.

  दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या ६७० झोपडीधारकसभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची माहिती घेत शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनीकरावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे, सुनील नहार आदी उपस्थित होते.

  उपमुख्यमंत्री पवार यांनी सदनिकातील सुविधा, सौर ऊर्जेची व्यवस्था, इमारतीची सुरक्षा, देखभाल आणि स्वच्छता, परिसरातीलवृक्षारोपण, जलपुनर्भरण आदीविषयी माहिती घेतली. इमारतीच्या परिसरात स्वच्छता राखावी, प्रकल्पातील विविध सेवांसाठीस्थानिकांना संधी द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.

  पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन झोपडी धारकांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले. इमारतीत चांगल्या सुविधादेण्यात आल्या असून त्या नीटपणे वापराव्यात. घरासोबत इमारतही स्वच्छ व सुंदर राहील असा सर्वांनी प्रयत्न करावा, असे त्यांनीलाभार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. मेट्रो सुविधा निगडीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले. महानगरपालिका आयुक्त सिंह यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

  -मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक
  मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून इतर आरक्षणाला कोणताच धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण, ते उच्च न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. तो निर्णय उच्च न्यायालयात टिकला पण सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार घटनेच्या तरतुदीत टिकेल, असे आरक्षण देण्यास महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. मुस्लिम समाजालाही न्याय दिला पाहिजे. त्या उद्देशाने त्यांच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला. त्यांच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.