प्रेमी तरुण-तरुणीने लग्न केले आहे तर समाजाला तोंड देण्याची तयारीही ठेवावी, राजस्थान हायकोर्टाने टोचले कान

एका युवक आणि युवतीने लग्न केले आणि त्यानंतर या जोडप्याने पोलीस सुरक्षेकरता हायकोर्टात धाव घेतली. मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळत, त्यांना सुरक्षेची गरज नसल्याचे सांगितले आहे. जर या तरुण-तरुणीने लग्न करण्याचा निर्णय घएतला आहे, तर समाजाला तोंड देण्याचे साहसही ठेवायला हवे, असे कोर्टाने सुनावले आहे.

    जोधपूर : एका युवक आणि युवतीने लग्न केले आणि त्यानंतर या जोडप्याने पोलीस सुरक्षेकरता हायकोर्टात धाव घेतली. मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळत, त्यांना सुरक्षेची गरज नसल्याचे सांगितले आहे. जर या तरुण-तरुणीने लग्न करण्याचा निर्णय घएतला आहे, तर समाजाला तोंड देण्याचे साहसही ठेवायला हवे, असे कोर्टाने सुनावले आहे. लग्न केल्यानंतर आपआपल्या कुटुंबाला समजवण्याचीही तयारी या दोघांनी ठेवायला हवी, असेही कोर्टाने सांगितले आहे. सद्यस्थिती लक्षात घेता आणि तथ्य पाहता या दोघांच्याही जिवाला धोका आहे, से वाटत नाही, असे मतही कोर्टाने नोंदवले आहे.

    सुरक्षा मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका 

    जोधपूर जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुणाने आणि १८ वर्षीय तरुणीने कुटुंबाविरोधात जाऊन लग्न केले आहे. त्यानंतर दोघांनीही सुरक्षेसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. या दोघांवर हल्ला होईल, असे कोणतेही पुरावे नसल्याचे मत हायकोर्टाने व्यक्त केले. योग्य प्रकरणात जोडप्यांना कोर्ट नक्कीच संरक्षण देऊल, मात्र हे जोपडे ज्या समर्थनाची मागणी कोर्टाकडे करीत आहे, ते त्यांना देण्यात येणार नाही, असे जस्टीस दिनेश मेहता यांनी स्पष्ट केले.

    समाजाला तोंड देण्याचे शिकावे लागेल

    कोर्टाने म्हटले आहे की, या जोडप्याला एकमेकांचे समर्थन करणे आणि समजाचा सामना करणे, शिकावे लागेल. जर कुण्या व्यक्तीने या जोडप्याला त्रास दिला, तर पोलीस आणि कोर्ट त्यांचा बचाव करतील. मात्र सुरक्षेचा दावा ते अधिकार म्हणून करु शकत नाहीत, असे जस्टीस मेहता यांनी स्पष्ट केले. या कारणावरुन कोर्टाने त्यांच्या सुरक्षेची मागणी फेटाळली आहे.