मी सीडी काढली तर, त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; मलिकांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

देवेंद्र फडणवीस यांचा भांडाफोड करण्यासाठी मी अजून हायड्रोजन बॉम्ब फोडला नाही, तो योग्य वेळी फोडेन, असा इशारा नवाब मलिकांनी दिला आहे.

    पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक चांगलेच चर्चेत आले आहेत. नवाब मलिक यांनी केेलेल्या आरोप आणि गौप्यस्फोटांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पाहायला मिळाली होती. तर नवाब मलिक यांनी केलल्या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एनसीबी झाली आता ईडीची बारी, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

    तर आता लवकरच ईडीचा पर्दाफाश करणार असल्याचा दावाही नवाब मलिकांनी केला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी बोलताना नवाब मलिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

    मलिक नेमकं काय म्हणाले? 

    देवेंद्र फडणवीस यांचा भांडाफोड करण्यासाठी मी अजून हायड्रोजन बॉम्ब फोडला नाही, तो योग्य वेळी फोडेन, असा इशारा नवाब मलिकांनी दिला आहे. माझ्याकडेही भाजपवाल्यांच्या अशा सीडी आहेत की त्या लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा खळबळजनक दावाही नवाब मलिकांनी केला आहे. हा माझा व्यक्तिगत लढा नसून केंद्रीय तपास यंत्रणांविरोधातील लढा आहे. म्हणून मी एनसीबीच्या बोगस कारवाया उघड केल्या. मनातील भीती काढून टाकू आणि भाजप विरोधात लढू, नक्की यश येईल, असा सल्ला नवाब मलिकांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.