लाज उरली असेल तर आदित्य ठाकरेंनी तत्काळ राजीनामा द्यावा: नितेश राणेंची मागणी

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, नितेश राणेंना एवढे गांभिर्याने का घेत आहात. त्यांच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. फक्त राजकारणासाठी दिसतं आणि बोलतं राहायचे एवढंच काम ते करत असतात. त्यांना इतका कळवळा होता तर मग यांच्यापैकी कोणी तरी पाठवली का रुग्णवाहिका ?

    मुंबई (Mumbai) : वरळी बीडीडी चाळीत सिलिंडर स्फोटात तिघांचा मृत्यू झाला आहे, यावरूनच आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  महापालिका आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका कुटुंबाचा बळी गेला आहे. आता मुंबईचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जरा लाज उरली असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असे नितेश राणे म्हणाले आहेत. तर राणेंच्या या टिकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे की, केवळ अस्तित्व दाखविण्यासाठी  टिका करणा-या राणेंना गंभीर घेण्याची गरज नाही.


     
    फक्त राजकारणासाठी दिसतं आणि बोलतं राहायचे
    किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, नितेश राणेंना एवढे गांभिर्याने का घेत आहात. त्यांच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. फक्त राजकारणासाठी दिसतं आणि बोलतं राहायचे एवढंच काम ते करत असतात. त्यांना इतका कळवळा होता तर मग यांच्यापैकी कोणी तरी पाठवली का रुग्णवाहिका ? शिवसैनिक आणि कार्यकर्तेच सुरुवातीला मदतीला धावले आहेत. त्यामुळे विनाकारण नितेश राणे यांनी राजकारण करु नये. पुढे त्या म्हणाल्या, वरळीतील घटना घडली त्यावेळी शिवसैनिक तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात जखमींना दाखलही करण्यात आले

    शेलार डोक्यावर पडले असून सत्ता गेल्याने तडफड
    पेडणेकरांनी यावेळी आशिष शेलार यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, आशिष शेलार उद्विग्न, भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना त्यांच्या पक्षात काही स्थान राहीले नाही, आपण कोणाविषयी बोलतो याची त्यांना जाणिव नाही. माझ्याबाबतीत त्यांनी केलले वक्तव्य चुकीचे आहे. उत्तर प्रदेशात ६० लहान मुले ऑक्सिजनविना गेली तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या, असा सवालही त्यांनी शेलार यांना केला आहे. शेलार हे डोक्यावर पडले असून सत्ता गेल्याने तडफड करत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.