पीडितांना तात्काळ पेन्शन लागू करा; जिल्हाधिकारी रेखावार यांच्या सूचना

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या खून आणि मृत्यू प्रकरणांमध्ये १९९५ पासून प्रलंबित असलेल्या पीडित वारसांना तात्काळ पेन्शन लागू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी दिल्या.

    कोल्हापूर : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या खून आणि मृत्यू प्रकरणांमध्ये १९९५ पासून प्रलंबित असलेल्या पीडित वारसांना तात्काळ पेन्शन लागू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी दिल्या.

    जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

    अहवाल ४८ तासात उपलब्ध करा

    अनुसूचित जाती-जमातीमधील पीडित मुलींना महिला व बालविकास विभागाच्या वतीने समुपदेशन व कायद्याची माहिती द्यावी. पीडित मुलींचा वैद्यकीय तपासणी अहवाल ४८ तासात उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. प्रलंबित प्रकरणांचा पोलीस विभागाने तपास करुन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.