कट्टरपंथियांसमोर इम्रान सरकारची शरणागती, दहशतवाद्यांच्या अटकेच्याविरोधात आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर घाबरले इम्रान खान, शेकडो दहशतवाद्यांना सोडले

पाकिस्तानचे पंतप्धान इम्रान खान सध्या चोहुबाजूनी अडचणीत सापडलेले आहेत. एकीकडे दहशतवादी संघटना पाकिस्तानातील शहरांना लक्ष्य करीत आहेत, तर दुसरीकडे कट्टरपंथीय सरकारला प्रत्येक मुद्द्य़ावर शरणागती पत्करायला भाग पाडत आहे.

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्धान इम्रान खान सध्या चोहुबाजूनी अडचणीत सापडलेले आहेत. एकीकडे दहशतवादी संघटना पाकिस्तानातील शहरांना लक्ष्य करीत आहेत, तर दुसरीकडे कट्टरपंथीय सरकारला प्रत्येक मुद्द्य़ावर शरणागती पत्करायला भाग पाडत आहे. दहशतवाद्यांसमोर पाकिस्तानातील सरकार किती दुर्बल आहे, याचे उदाहरण गुरुवारी इस्लामाबादमध्ये पाहायला मिळाले.

    गुरुवारी कट्टरपंथीय राजकीय नेते मौलाना फजल अल रहमान यांच्या खासदारांना सुरक्षा देण्याच्या कारणावरुन, अन्सार उल इस्लामचे अनेक दहशतवादी संसदेच्या परिसरात शिरले. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्यांना अटक केली. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात मौलाना फजल उल रहमान यांनी निदर्शने आणि रास्तारोको करण्याची धमकी दिली आणि सरकारला त्यांचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. इम्रान सरकारने शुक्रवारी सकाळी या सगळ्या दहशतवाद्यांना सोडून दिले.

    गेल्या महिन्यातही टीटीपीच्या ४६ दहशतवाद्यांना दिले होते सोडून
    दहशतवाद्यांना सोडून देण्याचे इम्रान खान सरकारचे हे पहिलेच आदेश नाहीत. गेल्या महिन्यातही तहरीक ए तालिबामन पाकिस्तानचे ४६ दहशतवादी तहाच्या इराद्याने सोडण्यात आले होते. मात्र तहरीकला १०२ दहशतवाद्यांची सुटका हवी होती.

    इम्रान खान यांना हटविण्याची तयारी
    इम्रान खान यांना पदावरुन हटविण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. विरोधकांनी संसदेत आणलेलेया अविश्वास प्रस्तावावर २२ मार्चला मतदान होणार आहे. मैलाना फजल यांच्या पक्षानेही या अविश्वास ठरावाला पाठिंबा दर्शवला आहे. पीपीपीचे सहअध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी या प्रस्तावाला २०० खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. इतक्या संख्याबळावर इम्रान खान यांना पदच्युत करणे शक्य होणार आहे.

    कोण आहेत मौलानाउल रहमान
    मौलाना हे पाकिस्तानातील सर्वात मोठी पार्टी आणि सुन्नी कट्टरपंथीयांचे दल जमीयत उलेमा ए इस्लाम याचे प्रमुख आहेत. त्यांना तालिबानचे समर्थक मानण्यात येते. सैन्याच्याही ते जवळचे मानले जातात. बहुमताशिवाय जेव्हा इम्रान खान २०१८ साली सत्तेत आले, त्यावेळी त्यांना सैन्याने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप मौलाना यांनी केला होता.