चंद्रपूरमध्ये दोन ट्रक आणि पेट्रोल टॅंकर मध्ये टक्कर, चौघांचा मृत्यू

मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस तपास सुरू आहे.

    चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर (Ajaypur)येथे गुरुवारी रात्री दोन ट्रक आणि पेट्रोलचा टॅंकर एकमेकांवर धडकून अपघात झाला आहे. या अपघातानतंर ट्रकला आग लागली. या आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झाला आहे.

    चंद्रपूर-मूल मार्गावरील भीषण ट्रक अपघातानंतर आग लागून चौघा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अजयपूर गावाजवळ काल (गुरुवारी) रात्री दोन ट्रक एकमेकांवर धडकून अपघात झाला होता. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण आग (Fire) लागली होती. ट्रकचे टायर फुटल्याने आग भडकली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती आहे. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस तपास सुरू आहे.