शिरळमध्ये बिबट्यांचा वावर वाढला; गोठ्यात शिरुन वासरला केले गंभीर जखमी

शिकारीच्या शोधात हे वन्य प्राणी पाळीव प्राण्याच्या शिकारीसाठी वस्त्यांमध्ये (Leopard attack) येतात. अशीच घटना चिपळूण तालुक्यातील शिरळ येथे घडली आहे.

    चिपळूण : जंगली हिंस्त्र प्राण्यांचे (Wild Animal) गावांच्या वस्तीमध्ये येऊन हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. शिकारीच्या शोधात हे वन्य प्राणी पाळीव प्राण्याच्या (Pet Animals) शिकारीसाठी वस्त्यांमध्ये (Leopard attack) येतात. अशीच घटना चिपळूण (Chiplun) तालुक्यातील शिरळ (Shiral) येथे घडली आहे.

    शिरळ येथे राहणाऱ्या प्रकाश व्यंकटेश साठे यांच्या बंदिस्त गोठ्यात बांधलेल्या वासरावर काल (दि.03) मध्यरात्री एकच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यामध्ये वासराला बिबट्याने गंभीर जखमी केले. वासराने दूध प्यायल्यावर ते शिरेतून बाहेर येत होते. यानंतर गायीच्या हंबरड्याने गोपालांना जाग आली आणि लाईट लावल्यामुळे बिबट्या पळून गेल्याची माहिती प्रथमदर्शी लोकांनी दिली.

    बंदिस्त गोठ्याच्या पोटमाळ्यावरून बिबट्या गोठ्यामध्ये शिरला आणि त्य़ाने वासरावर हल्ला केला. मात्र गायीच्या हंबरड्यामुळे आणि गोपालांनी प्रसंगावधान दाखवत लाईट लावल्यामुळे दुर्घना टळली. बिबट्याने गोठ्याला लावलेली जाळी वाकवून गोठ्यातून पळ काढला.   याबाबत प्रकाश साठे यांनी वनविभागाला माहिती कळवण्यात आली आहे. शिरळ गावात बिबट्याचा संचार वाढला असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यामुळे पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.