परमबीर सिंह भारतातच, जिवाला धोका असल्यामुळे लपून बसलेत, वकिलांची सर्वोच्च न्यायालयात माहिती

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा आहे. परमबीर सिंह यांनी अटक न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे.

    मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा आहे. परमबीर सिंह यांनी अटक न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे. परमबीर सिंह हे भारतातच असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दिली.

    महाराष्ट्र पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने परमबीर सिंह समोर येत नाहीत. पुढील ४८ तासात कोणत्याही सीबीआय किंवा इतर कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केलाय.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

    दरम्यान, मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. परमबीर सिंग व रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आलंय.

    परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंग न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं आहे. गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. आता न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासह रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित केलं आहे.

    गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कोर्टात अर्ज दाखल केला होता. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज दाखल करून सिंग व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.