Shame on Jalgaon Municipal Corporation for sealing bank accounts? 13 crore arrears of revenue department

दीड वर्षानतंर झालेल्या जळगाव महापालिकेच्या पहिल्याच महासभेत बुधवारी उपमहापौर कुलभूषण पाटील व भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात जबर राडा झाला. उमहपौर पाटील यांना व्यासपीठावर बसू देण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच सभेत तणाव निर्माण झाला. सभेस सुरुवात होताच भाजपाचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या व्यासपीठावर बसण्याला हरकत घेण्यावरून हा वाद झाला(In Jalgaon Municipal Corporation, there is a dispute between the Deputy Mayor and the corporators).

    जळगाव : दीड वर्षानतंर झालेल्या जळगाव महापालिकेच्या पहिल्याच महासभेत बुधवारी उपमहापौर कुलभूषण पाटील व भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात जबर राडा झाला. उमहपौर पाटील यांना व्यासपीठावर बसू देण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच सभेत तणाव निर्माण झाला. सभेस सुरुवात होताच भाजपाचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या व्यासपीठावर बसण्याला हरकत घेण्यावरून हा वाद झाला(In Jalgaon Municipal Corporation, there is a dispute between the Deputy Mayor and the corporators).

    एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक

    महापौर बोलत असतानाच कैलास सोनवणे यांनी उपमहापौर पाटील यांना उद्देशून ‘तोडपाणी करण्यासाठी उपमहापौर व्यासपीठावर बसले आहेत का? तू तुझे हे छपरी धंदे बंद कर?, अशा शब्दांत सुनावले. तसेच उपमहापौरांनी व्यासपीठावर बसण्याचा नियम आहे का? मला त्याची माहिती द्या, असे महापौरांना सांगितले. त्

    यामुळे उपमहापौर संतापले आणि ‘तुम्ही तुमचे बघा, तुम्ही सात वर्षांत काय धंदे केले ते सिद्ध करतो, असे म्हटले. तुम्हाला पालिकेच्या मोठ्या घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, तुम्हाला सभागृहात बसण्याचा तरी नैतिक अधिकार आहे का? असा टोलाही उपहामौपर पाटील यांनी कैलास सोनवणे यांना लगावला. याच मुद्यावरून शाब्दिक वाद वाढला अन् दोघेही एकेरीवर आले. दरम्यान, वाद वाढताच शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितिन लढ्ढा, विष्णू भंगाळे तसेच विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी मध्यस्थी करीत दोघांना शांत केले.