नागपूर जिल्ह्यात सहा महिन्यांनंतर ४४ जण कोरोना पॉझिटिव्ह

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात बाधितांची संख्या कमी असल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत होता. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून कमी नोंद होत असलेल्या बाधितांच्या संख्येने अचानक उसळी घेतली.

  नागपूर (Nagpur) : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात बाधितांची संख्या कमी असल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत होता. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून कमी नोंद होत असलेल्या बाधितांच्या संख्येने अचानक उसळी घेतली. मंगळवारी ४४ बाधितांची नोंद करण्यात आल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली. त्यामुळे नागपूरकरांना योग्य खबरदारी घेऊन करोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे पालन करा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.

  मंगळवारी ३ हजार ९८६ तपासण्यांचा अहवाल प्रात्त झाला. शहरात ३४ आणि ग्रामीणमध्ये तीन पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्याबाहेरील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात आहे. शहरात २ हजार ८१० तर ग्रामीणमध्ये १ हजार १७६ तपासण्या करण्यात आल्या. २५ डिसेंबर रोजी नागपुरातील बाधितांची संख्या वाढून २४ झाली. २६ डिसेंबरलाही आकडा वाढून ३२पर्यंत गेला. २७ डिसेंबरला आकड्यात घट होऊन संख्या १२ झाली. मात्र २८ डिसेंबरला अचानक ४४ झाल्याने सक्रिय बाधितांच्या संख्येत वाढ होऊन १५२ झाली आहे. मंगळवारी एक रुग्ण बरा झाला असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ९७.९२ आहे.

  दृष्टिक्षेपात
  ५ जून : १९७
  १२ जून : ७५
  १४ जून : ३०
  २६ जून : १८
  १० जुलै : २५
  २४ जुलै : २
  १२ ऑगस्ट : ८
  ११ सप्टेंबर : २
  ९ ऑक्टोबर : ८
  १३ नोव्हेंबर : ५
  २५ डिसेंबंर : २४
  २४ डिसेंबर : १२
  २६ डिसेंबर : ३२
  २८ डिसेंबर : ४४

  डिसेंबर महिन्यातील चित्र
  तारीख : पॉझिटिव्ह रुग्ण
  २८ डिसेंबर : ४४
  २७ डिसेंबर : १२
  २६ डिसेंबर : ३२
  २५ डिसेंबंर : २४
  २४ डिसेंबर : १२
  २३ डिसेंबर : ७
  २२ डिसेंबर : ५
  २१ डिसेंबर : १३
  २० डिसेंबर : ६
  १९ डिसेंबर : ४
  १८ डिसेंबर : १