सांगली शहरात मतदारांमध्ये उदासीनता तर ग्रामीण भागात ९९ टक्के मतदान

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Sangli District Bank Election) ग्रामीण भागात चरशीने सायंकाळी ४ पर्यंत ९९ टक्के तर एकूण मतदान ८८ टक्के मतदान झाले. सांगली शहरात मात्र मतदारांमध्ये उदासीनता पाहायला मिळाली. जिल्ह्यातील बारा ठिकाणी सकाळी ८ पासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. चुरशीने मतदान झाले.

  सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Sangli District Bank Election) ग्रामीण भागात चुरशीने सायंकाळी ४ पर्यंत ९९ टक्के तर एकूण मतदान ८८ टक्के मतदान झाले. सांगली शहरात मात्र मतदारांमध्ये उदासीनता पाहायला मिळाली. जिल्ह्यातील बारा ठिकाणी सकाळी ८ पासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. चुरशीने मतदान झाले.

  चारपर्यंत ८८ टक्के मतदान

  दुपारी १२ पर्यंत २५७३ पैकी १४३६ मतदारांनी मतदान केले होते. दुपारी १२ वाजताच ५६ टक्के मतदान झाल्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल असा अंदाज होता, तो अंदाज खरा ठरत सायंकाळी ४ पर्यंत २५७३ पैकी २१६४ मतदान झाले. नेते मंडळींसह उमेदवार प्रत्येक केंद्रावर भेटी देऊन मतदानाची आकडेवारी घेत होते. जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी तीन जागावर महाआघाडीचे आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, महेंद्र लाड यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत १८ जागांसाठी महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपचे शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत झाली.

  प्रथम पक्षीय पातळीवर मतदान

  सहकार पॅनेलने १८ तर भाजपच्या शेतकरी पॅनेलने १६ उमेदवार रिंगणात उभे केले हाेते. १२ अपक्षही रिंगणात आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक प्रथमच पक्षीय पातळीवर झाली. त्यामुळे महाआघाडी आणि भाजप उमेदवारांमध्ये चुरस पहायला मिळाली.  सोसायटी गटातील जत, आटपाडी, तासगाव आणि अन्य गटात चुरस निर्माण झाली आहे. क्रॉस व्होटींगची भिती असल्यामुळे उमेदवार दक्ष आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत एकुण २५७३ मतदार आहेत. मिरज आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी दोन मतदान केंद्रावर तर अन्य तालुक्यात प्रत्येकी एक मतदान केंद्रावर मतदान झाले.

  जयंत पाटील, विश्‍वजित कदमांची हजेरी

  राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्यासह भाजपचे नेते नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार आदींसह उमेदवार मतदान केंद्रावर हाेते. सायंकाळी पाचपर्यंत मतदानाची वेळ हाेती. बुधवारी (दि. २३) मिरजेत शेतकरी भवनमध्ये मतमोजणी होणार आहे.