2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिलीय; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं. आता यावर धनंजय मुंडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  बीड : सध्या राज्यात जिल्ह्यातील तीन नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून त्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबतं पहायला मिळत आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी देखील प्रचारात उडी घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं. आता यावर धनंजय मुंडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

  निवडणुकीच्या तोंडावर 100 कोटीची घोषणा करतात, दोन वर्ष काय टाळ कुटत होते का?, असं टीकास्त्र पंकजा मुंडे यांनी वडवणी नगरपंचायतच्या सभेत धनंजय मुंडेंवर सोडलं होतं. आता यावर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

  धनंजय मुंडे यांचं प्रत्यूत्तर

  केज नगरपंचायतमध्ये साधा एकही उमेदवार भाजपला मिळत नाही. एवढी वाईट वेळ भाजपवर आली आहे. साधा एक उमेदवार उभा करता आला नाही तुम्हाला अन् तुम्ही माझी औकात काढताय. याशिवाय 2019 ला निवडणूक परळीच्या जनतेने तुम्हाला औकात दाखवून दिली, हे विसरलात का?, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला आहे.

  बीडमध्ये मुंडे बहिण भावात आरोप प्रत्यारोपाचा खेळ चांगलाच रंगला आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आता या निवडणुकीत काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.