म्हाडाच्या घरासाठी चढाओढ! पण नवी मुंबई-पनवेल परिसरात खासगी प्रकल्पातील घरांना ग्राहक मिळेना

क्रेडाई-एमसीएचआयने अलीकडेच केलेल्या पाहणीनुसार, महामुंबई क्षेत्रात जुन्या प्रकल्पांतील जवळपास ३० हजार घरे विक्रीविना पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ती विकण्यासाठी विकासकांची धडपड सुरू आहे.

    मुंबई : एकीकडे नवी मुंबईतील म्हाडाची (Mhada) घरं विकत घेण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागलेली असताना दुसरीकडे मात्र एमएमआरमधील नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील खासगी प्रकल्पांतील घरांकडे लोकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे. एमएमआरमधील नवी मुंबई (Navi Mumbai) आणि पनवेल (Panvel) परिसरात खासगी प्रकल्पांतील जवळपास ३० हजार घरे ग्राहकांअभावी पडून आहेत.

    [read_alsocontent=”https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/traffic-signals-in-mumbai-are-becoming-hi-technew-652-led-traffic-signals-for-the-convenience-of-motorists-nrps-393864/~मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल होत आहेत हायटेक! वाहनचालकांच्या सोयीसाठी नवे 550 एलईडी ट्रॅफिक सिग्नल”]

    सिडकोच्या नव्या घरांना मागणी

    गेल्या काही वर्षापासुन सिडको नव्या घरांची निमिर्ती करत आहेत. ही घरं सर्वसामान्यांना परवडत असल्याने मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. अशाप्रकारे सिडकोच्या वतीने मागील पाच वर्षांत जवळपास २५ हजार घरे बांधून त्यांचे वाटप करण्यात आले आहे, तर पुढील पाच वर्षांत आणखी ८७ हजार घरे बांधण्याची सिडकोची योजना आहे. या सर्वांचा परिणाम सर्वसामान्य लोकांनी खासगी विकासकांच्या घरांकडे पाठ फिरवल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    जुन्या प्रकल्पांतील जवळपास ३० हजार घरे विक्रीविना

    गेल्या काही वर्षात म्हणून रायगडमध्येही गृहंसकुले उभारण्यास लोकांनी पसंती मिळतेय त्यामुळे या परिसरातील पनवेल, कर्जत, पाली, खालापूर आदी भागांत मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत, यामुळे मात्र, महामुंबई क्षेत्रात जुन्या प्रकल्पांतील जवळपास ३० हजार घरांना ग्राहक मिळत नसल्याची माहिती क्रेडाई-एमसीएचआयने अलीकडेच केलेल्या पाहणीनुसार समोर आली आहे.  त्यामुळे ती विकण्यासाठी विकासकांची धडपड सुरू आहे.

    घरे विकण्यासाठी विकासकांचे प्रयत्न सुरू

    म्हाडा आणि सिडकोच्या घरांमुळे आता खासगी विकासकांना त्यांच्या घरांसाठी ग्राहकांची शोधाोध करावी लागत आहे. विक्री न झाल्याने अनेक घर बांधुन पडुन आहेत. ही शिल्लक घरे विकण्यासाठी विकासकांकडून विविध प्रयास केले जात आहेत. ग्राहकांना आकर्षक सवलती  देण्यात आहे. मालमत्या प्रदर्शन आयोजित करुन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीह पदरी निराशा येत असल्याने खासगी विकांसक सध्या चिंतेत आहे.