कल्याण पूर्वेत बिबट्या नंतर आता कोल्ह्याचे आगमन

कल्याण पूर्वेतील विठ्ठल वाडी येथील साई नगर परिसरात रात्रीच्या वेळेस कोल्हाचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे. या कोल्ह्यास पकडण्यासाठी वनविभागाने सापाळा लावला आहे.

    कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी साईनगर शनिमंदीर परिसरात कोल्हा आल्याने नागरी भागात वन प्राण्यांच्या वावराच्या घटना वाढत आसल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी कल्याण पूर्वेत बिबट्या ने धुमशान घातले होते. त्यामध्ये एकाचा जीव गेला होता. तर दोन जणांना जखमी केले होते. वन विभागाने त्या बिबट्याला जेरबंद केल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता.

    कल्याण पूर्वेतील विठ्ठल वाडी येथील साई नगर परिसरात रात्रीच्या वेळेस कोल्हाचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे. या कोल्ह्यास पकडण्यासाठी वनविभागाने सापाळा लावला आहे. सी टि.व्ही मार्फत त्याच्या हालचालीवर वन विभागाचे लक्ष असून वन विभागाचे पथक कार्यरत आहे. अशी माहिती वन आधिकारी रघुनाथ चन्ने यांनी दिली. मंलगपट्टा डोंगर रांगातील वन्यप्राणी हे लगतच्या नागरी भागात दिसत असल्याने लोकांनी रात्रीच्या वेळेस दक्षता घेणे गरजेचे आहे.