राज्यात आज 46 हजार 406 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर 36 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज तब्बल  46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे.

    मुंबई : संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

    राज्यात आज तब्बल  46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे.

    राज्यात  आज  ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही.   आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 775 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

    36 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

    राज्यात आज  36  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 21 हजार 477 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 66 लाख 83 हजार 769 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.39 टक्के आहे.

    सध्या राज्यात 17 लाख 95  हजार  631  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9124 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7, 13 , 59,  539  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.