एमजी मोटरद्वारे मालाड येथे नवीन सर्व्हिस केंद्राचे उद्घाटन; पश्चिम भारतातील सर्वात मोठे एमजी वर्कशॉप

मुंबईतील प्रिमिअम एसयुव्हींसाठी प्रबळ बाजारपेठ क्षमता ओळखत एमजी मोटरच्या नवीन वर्कशॉपमध्ये कारमेकरच्या भावी ग्राहक दृष्टीकोनाचा एकूण लुक व फिल सामावलेला असून कंपनीचा ब्रिटीश वारसा देखील दिसून येतो.

    मुंबई : देशभरातील कार सर्विस अनुभवाला पूर्णत: पुनर्परिभाषित करण्याप्रती आपली कटिबद्धता कायम राखत एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) मुंबईतील मालाड (पश्चिम) येथे नवीन सर्व्हिस केंद्राच्या (Service center) उद्घाटनाची घोषणा केली आहे. पश्चिम भारतातील सर्वात मोठे एमजी वर्कशॉप (The largest MG workshop in West India) म्हणून मानले जाणारे हे केंद्र शहरातील अधिकाधिक ग्राहकांच्या सर्वसमावेशक गतीशीलता गरजांची पूर्तता करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

    मुंबईतील प्रिमिअम एसयुव्हींसाठी प्रबळ बाजारपेठ क्षमता ओळखत एमजी मोटरच्या नवीन वर्कशॉपमध्ये कारमेकरच्या भावी ग्राहक दृष्टीकोनाचा एकूण लुक व फिल सामावलेला असून कंपनीचा ब्रिटीश वारसा देखील दिसून येतो.

    या उद्घाटनासह कारमेकर महाराष्ट्रामध्ये ४३ टचपॉइण्ट्सचे कार्यसंचालन पाहते आणि कंपनीची २०२२ अखेरपर्यंत राज्यामध्ये ४५ टचपॉइण्ट्सपर्यंत विस्तारित होण्याची योजना आहे. आतापर्यंत कारमेकरची भारतभरात एकूण ३१० टचपॉइण्ट्स केंद्रे आहेत.

    एमजी मोटर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, “एमजी मालाड वर्कशॉपचे उद्घाटन मुंबईतील आमच्या ग्राहकांसाठी सर्विस अनुभवामध्ये वाढ करण्याच्या आमच्या योजनांशी संलग्न आहे. हे केंद्र सर्विस, स्पेअर पार्टस् व ॲक्सेसरीजसह सर्व आवश्यकतांची पूर्तता करेल.”

    एमजी मालाडचे डीलर प्रिन्सिपल गौतम मोदी म्हणाले, “अग्रणी व भविष्यकालीन ब्रॅण्ड म्हणून एमजीने नवोन्मेष्कारी व तंत्रज्ञान-केंद्रित दृष्टीकोनाच्या आधारावर भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये अग्रणी बदल केले आहेत. आम्हाला ब्रॅण्डसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. आम्ही मुंबईमधील ग्राहकांना नवीन व अद्वितीय ऑटोमोटिव्ह सर्विस देण्याकरिता एमजीचा प्रबळ ब्रिटीश वारसा आणि तंत्रज्ञान लक्ष्याचा फायदा घेऊ.”