राज्य शासनाच्या विविध विभागात नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा देत सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा वाढवली आहे.

तुम्हीही गेल्या काही वर्षापासुन सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहात काय?  मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्य शासनाच्या (Maharashtra Government) विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा वाढवुन देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याचं परिपत्रक जारी केले आहे. ही वयोमर्यादा  दोन वर्ष वाढवून देण्यात आली आहे…

कोरोना काळात शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करण्यांचे दोन वर्षे वाया गेल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो बेरोजगारांना दिलासा मिळाला आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्या संदर्भातला परिपत्रक आज जारी केला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राज्य शासनातील विविध विभागात ७५००० नोकर भरतीची घोषणा सरकारने केली होती. मात्र कोरोनामुळे नोकरीसाठी अर्ज करता न आल्याने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागात नोकरभरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी आता वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३८ वर्ष अशी वयोमर्यादा होती, आता ती या निर्णयामुळे ४० वर्ष होणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ ऐवजी ४५ वर्षांची वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

कुणाला होणार फायदा

कोरोनाकाळात सरकारी नोकरभरती ठप्प होती. त्यामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा देत सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा वाढवली आहे.