बियाणांच्या पाकिटाच्या दरात वाढ; शेतकऱ्यांना किती पैसे मोजावे लागणार?

    औरंगाबाद : सध्या कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. कापसाचे दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांना वाढत्या बियाणाच्या दराचा सामना करावा लागणार आहे. यंदा कापसाला विक्रमी असा 11 हजाार रुपये क्विंटलचा दर मिळाला.

    दरम्यान त्यामुळे आगामी खरिपात कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र दिसत असतानाच ‘बीजी 2’ या बियाणाच्या पाकिटाच्या दरात तब्बल 43 रुपयांची वाढ करण्याचा अधिसूचनाच सरकारने काढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बियानांबाबद मोठा खर्च होणार आहे.

    बियाणे दरात वाढ होण्याची शक्यता बियाणे उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार ‘बीजी 1’ चे दर आहे तेच ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे अधिकची मागणी असलेल्या ‘बीजी2’ या बियाणे पाकिटात तब्बल 43 रुपायांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता वाढीव दरात कापसाची विक्री केली तर वाढीव दरानेच बियाणे खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावणार आहे.

    कापूस बियाण्याचे दर वाढलेले आहेत. या वर्षी पासून नवीन दराची अंमलबजावणी होणार आहे. ‘बीजी1’ आणि ‘बीजी2’ या बियाणांची निर्मिती करणाऱ्या देशभर कंपन्या आहेत. बियाणे तयार करण्यासाठी होणारा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे ‘बीजी2’ हे बियाणाचे पाकीट मागच्या वर्षी 767 रुपायांना होते. ते आता 810 रुपायांना मिळणार आहे. यामध्ये 43 रुपायांची वाढ करण्यात आली आहे. यासंबंधीच्या अधिसूचना कृषी व शेतकरी कल्याण विभागाने काढलेल्या आहेत.