…म्हणून वाफळे ग्रामस्थांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु

तालुक्यातील वाफळे येथील ग्रामसेवक तानाजी माने यांनी अतिक्रमणाबाबत योग्य तो ठराव करू न दिल्यामुळे ग्रामस्थांसह २६ नोव्हेंबर शहीद दिनापासून मोहोळ पंचायत समिती कार्यालयासमोर वाफळे ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तालुक्यातील वाफळे येथील ग्रामसेवक तानाजी माने यांनी अतिक्रमणाबाबत योग्य तो ठराव करून न दिल्यामुळे ग्रामस्थांसह २६ नोव्हेंबर शहीद दिनापासून मोहोळ पंचायत समिती कार्यालयासमोर वाफळे ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

    दरम्यान या आंदोलनास महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांतर्फे प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मोहोळ तालुक्यातील वाफळे येथे अतिक्रमणामुळे अनंत अडचणी निर्माण होत असून, याला ग्रामसेवक जबाबदार आहेत. त्यांनी अतिक्रमणाबाबत योग्य तो ठराव देण्यास नकार दिला असून, जोपर्यंत सदर ठराव बदलून देत नाहीत, तोपर्यंत शहीद दिन २६ नोव्हेंबरपासून मोहोळ पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

    या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला असून, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत योग्य तो निर्णय नाही झाल्यास वाफळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार असल्याचा इशारा यावेळी भैया देशमुख यांनी दिला आहे.

    यावेळी वाफळे येथील आंदोलनकर्ते सचिन चव्हाण, राजाभाऊ शिंदे, श्रीराम दाढे, अंकुश खडूळ, किरण खडूळ, समाधान खडूळ, भागवत दाढे, शरद दाढे, समाधान दाढे, सागर दाढे, सुजित राऊत, गणेश दाढे, पांडू रामोशी आदींसह वाफळे येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.