आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातील कर्मचारी संपावर

महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपामध्ये अकलूजमधील शंकरराव मोहिते महाविद्यालय येथील शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संप गेले आहेत. 

    अकलूज : अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे महाविद्यालयाचे कार्यालयीन कामकाज आज ठप्प झाले आहे.

    महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपामध्ये अकलूजमधील शंकरराव मोहिते महाविद्यालय येथील शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संप गेले आहेत. यामध्ये महाविद्यालय शिक्षकेतर महासंघ आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सोलापूर विद्यापीठ शिक्षकेतर संघटना सहभागी झाल्या आहेत.

    आश्वसित प्रगती योजनेचे रद्द झालेला जीआर पुनर्जीवित करावेत, दहा, वीस, तीस वर्ष लाभाची आश्वसित प्रगती योजना, 786 विद्यापीठ कर्मचारी पदांना 7 वा वेतन आयोग, 58 महिन्यांचा फरक, पाच दिवसांचा आठवडा, रिक्त झालेली पदे त्वरीत भरावीत व इतर मागण्या संपामध्ये करण्यात आल्या असल्याचे संघटनेचे अध्यक्ष भारत जाधव, उपाध्यक्ष उदयसिंह माने देशमुख, सचिव सुनिता काटे सांगितले आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत महाविद्यालयाचे कामकाज बंद ठेवून बेमुदत संप चालूच ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.