कसा असेल स्वातंत्र्य दिनाचा सोहळा, यावेळी पाहायला मिळणार आत्मनिर्भर भारताची झलक !

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात यंदा प्रथमच लाल किल्ल्यावर स्वदेशी तोफांची सलामी दिली जाणार आहे. गेल्या वेळी केवळ एका स्वदेशी तोफेचा परेडमध्ये समावेश करण्यात आला होता. यावेळी स्वदेशी 105 MM फील्डगन 21 राउंड फायर करेल.

    नवी दिल्ली: उद्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day 2023) सोहळ्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी या सोहळ्यामध्ये काहीतरी विषेश नियोजन करण्यात येतं. यावेळी सोहळ्यासाठी 1800 हून अधिक विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे या समारंभात सर्वाना स्वदेशी तोफांचीच सलामी (Salute will be given only by indigenous guns) vदिली जाणार आहे. 15 ऑगस्टला प्रथमच ज्या 21 बंदुकांनी सलामी दिली जाणार आहे, त्या पूर्णपणे स्वदेशी आहेत. स्वदेशी 105 MM फील्डगन 21 राउंड फायर करेल. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करताना ब्रिटीशांच्या पाउंडर गनने सलामी दिली होती. पाउंडर गनने 20 राउंड फायर केले तर देशी 155 mm ATAGS मधून एक राउंड फायर करण्यात आला. यंदा प्रजासत्ताक दिनी ब्रिटीश पावडर गनच्या जागी स्वदेशी 105 एमए स्वदेशी फील्ड गनला सलामी देण्यात येईल.

    देशभरातून सुमारे 1800 पाहुण्यांना आमंत्रण

    देशभरातील सुमारे 1800 लोकांना त्यांच्या जोडीदारासह विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये 660 व्हायब्रंट गावांचे सुमारे 400 सरपंच आहेत. शेतकरी उत्पादक संस्था योजनेतील सुमारे 250 लोक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील 50 लोक, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेतील 50 लोक, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील 50 बांधकाम कामगार, 50 प्राथमिक शाळेतील शिक्षक, 50 परिचारिका, 50 मच्छीमार इत्यादींचा समावेश आहे.

    दिल्लीत 12 ठिकाणी बनवले सेल्फी पॉइंट

    यातील काही खास पाहुणे नॅशनल वॉर मेमोरियललाही भेट देतील आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची भेट घेतील. यासोबतच प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 75 जोडप्यांना त्यांच्या पारंपारिक पोशाखात लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टच्या उत्सवाचे साक्षीदार म्हणून पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. दिल्लीत 12 ठिकाणी सरकारच्या विविध योजनांशी संबंधित सेल्फी पॉइंटही बनवण्यात आले आहेत.