The T-20 captaincy was also removed from the ODI captaincy for not listening to him; BCCI President Sourav Ganguly's explanation about Virat Kohli

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी रोहीत शर्माची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. या बदलावरून सोशल मीडियावर विराट कोहली विरुद्ध सौरव गांगुली असा वाद चाहत्यांमध्ये सुरू असताना बीसीसीआयच्या अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेल्या एका विधानामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे(India can win without Virat; Excitement over BCCI President Sourav Ganguly's statement).

    मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी रोहीत शर्माची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. या बदलावरून सोशल मीडियावर विराट कोहली विरुद्ध सौरव गांगुली असा वाद चाहत्यांमध्ये सुरू असताना बीसीसीआयच्या अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेल्या एका विधानामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे(India can win without Virat; Excitement over BCCI President Sourav Ganguly’s statement).

    गांगुली एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला, काही वर्षापूर्वी झालेल्या आशिया कपमध्ये (2018) रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने विजय मिळवला होता. त्या संघात विराट कोहली नव्हता. कोहली शिवाय संघ जिंकला होता. यावरून स्पष्ट होते की रोहीतच्या नेतृत्वाखाली आमचा संघ किती मजबूत आहे.

    रोहीत शर्मा शानदार कर्णधार

    रोहीत एक शानदार कर्णधार आहे. म्हणून तर निवड समितीने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. तो संघाला पुढे घेऊन जाईल. आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. रोहीतने मोठ्या स्पर्धेत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्याकडे सर्वोत्तम संघ आहे आणि आशा आहे की तो टीम इंडियाला मोठे यश मिळवून देईल, असे गांगुली म्हणाला.

    काही दिवसांपूर्वी जेव्हा बीसीसीआयने वनडेचा कर्णधार म्हणून रोहीतच्या नावाची घोषणा केली होती. तेव्हा देखील गांगुलीने स्पष्ट केले होते की, ही निवड बीसीसीआय आणि निवड समितीने मिळून केली आहे. बीसीसीआयने विराटला टी-20 चे कर्णधारपद सोडू नये असा सल्ला दिला होता. पण त्याने तो ऐकला नाही. यानंतर बोर्डाने विराटला राजीनामा देण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. पण विराटकडून काहीच उत्तर न मिळाल्याने अखेर बीसीसीआयने निर्णय जाहिर केला.

    द्रविडचेही केले कौतुक

    भारतीय क्रिकेटच्या भविष्याबाबत बोलताना गांगुलीने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचेदेखील कौतुक केले. आपल्याकडे एक चांगला प्रशिक्षक आणि योग्य कर्णदार आहे. मागील 5 वर्षांत भारताने यशाचे झेंडे अटकेपार रोवले. त्यामुळे पुढेही भारतीय संघाची कामगिरी अशीच होईल. कानपूर कसोटीआधी भारतीय संघाच्या सराव सत्रानंतर द्रविड विकेट्स व सरावासाठी वापरण्यात आलेले चेंडू व अन्य सामान स्वतः उचलून ड्रेसिंग रुममध्ये घेऊन गेला, हे माझ्या ऐकण्यात आले. राहुलला मी बऱ्याच आधीपासून ओळखतो. तो असाच आहे. खेळाशी निगडीत लहानातल्या लहान गोष्टीकडे त्याचे बारकाईने लक्ष असते, असे गांगुली म्हणाला.