pilot sanjal

देशांतर्गत विमान कंपन्यांत सर्वाधिक महिला आहेत. त्यात रीजनल एअरलाईन्समध्ये १३.९ टक्के, लो कॉस्ट एअरलाईन्समध्ये १०.९ टक्के, मुख्य एअरलाईन्समध्ये १२.३ टक्के तर कार्गो एअरलाईन्समध्ये ८.५ टक्के महिला आहेत.

    नवी दिल्ली : देशात व्यवसायांच्या अनेक क्षेत्रांमध्ये लैंगिक असामनता असली, तरी हवी वाहतूक क्षेत्र मात्र त्याला अपवाद आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक महिला पायलट या भारतीय हवाई उद्योगात कार्यरत आहेत. हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी राज्यभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की देशात एकूण १७,७२६ रजिस्टर पायलट हेत, त्यात महिलांची संख्या २७६४ इतकी आहे. म्हणजेच एकूण पायलटपैकी १५ टक्के संख्या ही महिलांची आहे.

    मार्च २०२१च्या आकडेवारीनुसार, भारतीय विमान कंपन्यांमध्ये १२.४ टक्के महिला पायलट होत्या. डिसेंबरपर्यंत या आकड्यात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला, तर महिला पायलटची एकूम संख्या ही एकूण आकडेवारीच्या केवळ ५ टक्के इतकीच आहे. अमिरेका, ऑस्ट्रेलियासह इतर पश्चिमी देशांच्या तुलनेत भारतीतल महिला पायलट्सची संख्या दुप्पट आहे.

    देशांतर्गत हवाई उद्योगात १३.९ टक्के महिला
    देशांतर्गत विमान कंपन्यांत सर्वाधिक महिला आहेत. त्यात रीजनल एअरलाईन्समध्ये १३.९ टक्के, लो कॉस्ट एअरलाईन्समध्ये १०.९ टक्के, मुख्य एअरलाईन्समध्ये १२.३ टक्के तर कार्गो एअरलाईन्समध्ये ८.५ टक्के महिला आहेत.

    विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही महिलांची आघाडी
    जागतिक पातळीचा विचार केला तर महिलांनी चांगंली कामगिरी केलेली आहे. जागतिक पातळीवर डॉक्टरकीच्या व्य़यवसायात ४४ टक्के महिला आहेत. अंतराळवीरांत ३३ टक्के महिला आहेत. २९ टक्के वैज्ञानिक, २१ टक्के इंजिनिअर्स आणि ५ टक्के महिला या पायलट आहेत.