भारत-न्यूझीलंड पहिली टेस्ट, लंचपर्यंत भारताचा स्कोर ८२/१, गिल-पुजारा क्रिजवर, शुभमनची हाफ सेंच्युरी

  कानपूर : कानपुरात खेळवल्या जात असलेल्या टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून टीम इंडियाने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा केळताना लंचपर्यंत २९ ओव्हर्समध्ये टीम इंडियाचा एक प्लेअर बाद झाला असून, ८२ रन्स केले आहेत. चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल हे सध्या खेळत आहेत.

  टीम इंडियाची पहिली विकेट आठव्या ओव्हरमध्ये मयंक अग्रवालच्या रुपात गेली. मयंक १३ रन्सवर कॅच देऊन आऊट झाला. दुसऱ्या विकेटसाठी गिल आणि पुजारा यांनी लंचपर्यंत १२७ बॉलमध्ये ६१ रन्स केले आहेत. गिलने ८७ बॉल्समध्ये ५२ रन्स करत हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी दुखापतीमुळे टीममधून बाहेर पडलेल्या गिलने चांगले कमबॅक केले आहे.

  टीम इंडियाच्या प्लेयिंग ११ मध्ये ३ स्पिनर्स आणि दोन फास्ट बॉलर्सचा समावेश करण्यात आला आहे.

  दोन्ही टीम 

  टीम इंडिया- शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे (कॅप्टन), श्रेयस अय्यर, ऋद्धीमान साहा (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव

  न्यीझीलंड – टॉम लाथम, विल यंग, केन विल्यिम्स ( कॅप्ट्न), रॉस टेलर, हेनरी निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकिपर), सचिन रवींद्र, टीम साऊथी, एजाज पटेल, काईल जॅमिसनिलियम सोमरविले