indian army

जेटपॅक सूटमध्ये सैनिकांसाठी सुरक्षित आणि नियंत्रित टेक ऑफ आणि लँडिंग असणार जे कोणत्याही दिशेने उतरू शकते. याशिवाय, रोबोट 10,000 फूट उंचीवर चालण्यास सक्षम असावेत.

  संवेदनशील सीमा भागात टेहळणी यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि शत्रूच्या प्रत्येक हालचालीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर आपल्या पद्धतीत  (indian army) आता सतत हायटेक बदल करत आहे. लष्कराने सैनिकांसाठी जेटपॅक सूट, (Jetpacks) नवीन पिढीतील ड्रोन यंत्रणा (drone) आणि रोबोट्सच्या (robot) आपत्कालीन खरेदीसाठी निविदा काढल्या आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सैनिकांना ताशी 50 किमी वेगाने उड्डाण करता यावे यासाठी लष्कर 48 जेटपॅक सूट, 100 रोबोट्स आणि 130 फास्ट-ट्रॅक ‘टेथर्ड’ ड्रोन सिस्टम खरेदी करणार आहे.

  हायटेक पद्धतीने शत्रूवर ठेवणार लक्ष

  लष्कराने म्हटले आहे की जेटपॅक सूटमध्ये सैनिकांसाठी सुरक्षित आणि नियंत्रित टेक ऑफ आणि लँडिंग असावे, जे कोणत्याही दिशेने उतरू शकते. याशिवाय, यंत्रमानव 10,000 फूट उंचीवर चालण्यास सक्षम असावेत. हे ड्रोन सीमेवर दीर्घकाळ पाळत ठेवण्यासाठी योग्य असावे.

  जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतला धडा

  अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने आपत्कालीन खरेदीसाठी या निविदा जारी केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने हे पाऊल उचलले आहे. ज्यामध्ये आर्मेनिया-अझरबैजान ते रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष किंवा पूर्वेला चीनशी लष्करी संघर्ष. लष्कराने फास्ट ट्रॅक प्रोसिजर (FTP) द्वारे आणीबाणीच्या खरेदी अंतर्गत 48 जेट पॅक सूट खरेदी करण्यासाठी प्रस्तावासाठी विनंती (RFP) देखील जारी केली आहे.

  जेटपॅक्ट म्हणजे काय?

  जेटपॅक म्हणजे एक प्रकारच स्ट्रॅप-ऑन फ्लाइंग सूट. ज्यामध्ये एक लहान जेट इंजिन घातलेले असते, तसेच दोन लहान जेट इंजिन प्रत्येक हाताला थेट जोर देण्यासाठी परिधान केले जातात जेथे यामुळे व्यक्तीला हवेतून कोणत्याही दिशेने फिरता येते. जेटपॅक सूट घातल्याने एखादी व्यक्ती ताशी 50 किमी वेगाने उड्डाण करू शकेल. 1-2 मिनिटांसाठी नाही, तर तब्बल 8 मिनिटे उडू शकतील. उणे तापमान असो किंवा ४५ अंश उष्णतेमध्ये, हा सूट चांगला टिकून राहील. ते 80 किलोपेक्षा जास्त वजन उचलण्याची क्षमता आहे.