महिला आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ खेळाडूकडे संघाच नेतृत्त्व

महिला आशिया चषका स्पर्धा यंदा बांग्लादेशमध्ये 1 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, युएई आणि थायलंड या सात संघामध्ये टक्कर होणार आहे.

    महिला आशिया कप 2022 (Women’s T20 Asia Cup) स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी हरमनप्रीत कौरला कर्णधारपद सोपविण्यात आलं असून उपकर्णधारपदी स्मृती मानधना असणार आहे. या व्यतिरिक्त संघात आणखी कोणत्या खेडाळुंची वर्णी लागली आहे पाहुया.

    महिला आशिया चषका स्पर्धा यंदा बांग्लादेशमध्ये 1 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, युएई आणि थायलंड या सात संघामध्ये टक्कर होणार आहे. या मधील खेळाडूमध्ये हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, एस. मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पुजा वस्त्राकर, राधा गायकवाड, राधा यादव , के.पी.नवगिरे यांचा समावेश आहे तर, तानिया भाटीया, सिमरन दिल बहादुर या राखीव खेळाडू आहेत. महिला आशिया कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना श्रीलंका सोबत होणार आहे. तर, 7 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे.