देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, एकदा चार्ज केल्यावर ३१५ किमी करु शकणार प्रवास!

रिपोर्टनुसार, Tiago EV ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. या EV वर 1,60,000 किमी पर्यंत बॅटरी आणि मोटर वॉरंटी उपलब्ध असेल.

    Tata Motors ने आज त्यांच्या लोकप्रिय Tata Tiago चे EV हे मॅ़ाडल लाँच केलं. त्याची  किंमत 8.49 लाख रुपये आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 315 किमीची प्रवास तुम्ही करु शकता. या कारची बुकिंग 10 ऑक्टोबर 2022 पासून आणि वितरण जानेवारी 2023 पासून होईल.

    Tata Nexon EV आणि Tata Tigor EV सारख्या मॉडेलसह ऑटो जायंट आधीच देशातील ईव्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. टाटा टियागो ही ईव्ही सेगमेंटमधील भारताची पहिली प्रीमियम हॅचबॅक बनली आहे. DC फास्ट चार्जरसह Tiago बॅटरी 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी 57 मिनिटे लागतील.

    Tiago ला 8 स्पीकर सिस्टम, रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, इलेक्ट्रिक ORVM आणि बरेच काही मिळते. रिपोर्टनुसार, Tiago EV ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. या EV वर 1,60,000 किमी पर्यंत बॅटरी आणि मोटर वॉरंटी उपलब्ध असेल.

    Tata Tiago EV मध्ये दोन ड्रायव्हिंग मोड उपलब्ध असतील. ही EV 5.7 सेकंदात 0 ते 60 kmph चा वेग पकडेल. Tiago EV च्या पहिल्या 10,000 बुकिंगपैकी 2,000 युनिट्स विद्यमान टाटा EV वापरकर्त्यांसाठी राखीव असतील