भारतातील पहिली LNG नॅचरल गॅसवर चालणारी बस, नागपुरात झाली निर्मिती

भारतातील पहिली एलएनजी म्हणजेच लिक्विडीफाईड नॅचरल गॅस वर चालणारी बस नागपुरात तयार करण्यात आली आहे. महिंद्रा कंपनीची ही बस मुळात डिझेलवर चालणारी होती. मात्र "गो बस' या कंपनीने डिझेलवर चालणाऱ्या या बसला एलएनजी वर चालणाऱ्या बसमध्ये रूपांतरित केलं आहे. सुमारे अकरा लाख रुपयांचा खर्च यासाठी आला आहे.

    नागपूर (Nagpur) :  प्रदूषण मुक्त भारत (Pollution Free India) या मोहिमेअंतर्गत भारतातील पहिली एलएनजी म्हणजेच लिक्विडीफाईड नॅचरल गॅस (LNG) वर चालणारी बस नागपुरात तयार करण्यात आली आहे. लवकरच भंडारा जिल्ह्यातील मासाळ येथे बायो एलएनजी प्लांट तर नागपूर आणि रायपूर येथे एलएनजी स्टेशन उभारून मध्य भारतात एलएनजीची उपलब्धता कमालीची वाढणार आहे.

    भारतातील पहिली एलएनजी म्हणजेच लिक्विडीफाईड नॅचरल गॅस वर चालणारी बस नागपुरात तयार करण्यात आली आहे. महिंद्रा कंपनीची ही बस मुळात डिझेलवर चालणारी होती. मात्र “गो बस’ या कंपनीने डिझेलवर चालणाऱ्या या बसला एलएनजी वर चालणाऱ्या बसमध्ये रूपांतरित केलं आहे. सुमारे अकरा लाख रुपयांचा खर्च यासाठी आला आहे.

    डिझेलऐवजी एलएनजी वर चालणाऱ्या बसमुळे इंधनावर लागणारा खर्च अनेक पटींनी कमी होईल असा कंपनीचा दावा आहे… सध्या नागपुरात सुरू असलेल्या ऍग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनात ही बस लोकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.

    विशेष म्हणजे या कृषी प्रदर्शनात मानस ऍग्रो आणि लिफिनिटी बायो एनर्जी यांच्यात सामंजस्य करार झाला असून त्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील मासाळ याठिकाण बायो एलएनजी प्लांट उभारण्यात येणार आहेत.

    याशिवाय महाराष्ट्रात नागपूर आणि छत्तीसगडमधील रायपूर येथे हे एलएनजी स्टेशन उभारण्यात येणार असल्याने मध्य भारतात आता एलएनजी इंधनाची उपलब्धता कमालीची वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात विदर्भात डिझेल ऐवजी एलएनजी सारख्या बायो इंधनावर ट्रक आणि बसचे परिचालन वाळून इंधनाची बचत यासह प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.