तुम्हालाही Instagram story ठेवयला आवडते, मग ‘ही’ बातमी आहे तुमच्यासाठी!

या फीचर अंतर्गत, युझर्स त्यांची स्टोरी 7 दिवस ठेवू शकणार. हे निर्मात्यांना त्यांच्या प्रवासाच्या अनुभवांबद्दल, आगामी कार्यक्रमांबद्दल किंवा प्रोजेक्टच्या प्रकाशनाबद्दल दीर्घ कालावधीसाठी लोकांना अपडेट देऊ शकणार

    अनेकांना Instagram Story ठेवायला आवडतं. आपल्या आयुष्याशी निगडीत अपडेट्स लोकांपर्यंत पोहचण्यासाठी स्टोरी हा एक उत्तम पर्याय आहे. पण आपण ठेवलेली स्टोरी ही केवळ 24 तास कुणालाही पाहता येते. पण यामध्ये Instagram ने काही बदल केले असून युजर्सना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी आता नवं  फिचर आणण्यात येत आहे. या नव्या फिचरचं नाव आहे. “माय वीक” (My Week). कंपनी सध्या माय वीक नावाच्या फीचरवर काम करत आहे. हे फिचर वापरकर्त्यांना त्यांच्या संपूर्ण आठवड्यातील अॅक्टिव्हिटी एकाच ठिकाणी पाहता येईल. यामध्ये यूजर्सना त्यांच्या पोस्ट्स, स्टोरीज, रील्स आणि इतर अॅक्टिव्हिटीजची यादी दिसेल.

    My Week फिचर काय आहे?

    Instagram एका वैशिष्ट्यावर काम करत आहे जे वापरकर्त्यांना त्यांची स्टोरी 24 तासांपेक्षा जास्त काळ ठेवण्याची परवानगी देईल. या फीचरचे नाव आहे “माय वीक”. सध्या, Instagram वापरकर्ते फक्त 24 तास कथा शेअर करू शकतात. नवीन फीचर सादर केल्यानंतर, वापरकर्ते त्यांची स्टोरी 7 दिवसांसाठी ठेवू शकतील. याशिवाय यूजर्स स्टोरीजमध्ये नवीन स्टोरी जोडू किंवा हटवू शकतील.

    कधी सुरू होईल?

    हे फिचर कधी सुरू होईल इंस्टाग्रामने हे जाहीर केलेली नाही. पण लवकरच ते युजर्ससाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

    काय फायदा होईल?

    या फीचर अंतर्गत, युझर्स त्यांची स्टोरी 7 दिवस ठेवू शकणार. हे निर्मात्यांना त्यांच्या प्रवासाच्या अनुभवांबद्दल, आगामी कार्यक्रमांबद्दल किंवा प्रोजेक्टच्या प्रकाशनाबद्दल दीर्घ कालावधीसाठी लोकांना अपडेट देऊ शकणार