इन्स्टाग्राम फुकट वापरता येणार नाही, युझर्ससाठी लवकरच सबस्क्रिप्शन मॉडेल तयार होणार, दरमहा द्यावे लागमार ८९ रुपये

इन्स्टाग्राम(Instagram) युझर्सना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटसाठी जादा पैसे(Instagram Users Have To pay For Their Account) मोजावे लागणार आहेत. इन्स्टाग्राम नव्या सबस्क्रिप्शन(Instagram Subscription Model) फिचरवर काम करत आहे. असे झाल्यास कन्टेन्ट ॲक्सेस करण्यासाठी युझर्सना दरमहा ८९ रुपये द्यावे लागणार आहेत.

    नवी दिल्ली: इन्स्टाग्राम (Instagram)वापर करणाऱ्यांसाठी थोडी वाईट बातमी आहे. लवकरच इन्स्टाग्राम युझर्सना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटसाठी जादा पैसे(Instagram Users Have To pay For Their Account) मोजावे लागणार आहेत. इन्स्टाग्राम नव्या सबस्क्रिप्शन(Instagram Subscription Model) फिचरवर काम करत आहे. असे झाल्यास कन्टेन्ट ॲक्सेस करण्यासाठी युझर्सना दरमहा ८९ रुपये द्यावे लागणार आहेत. याचा फायदा इन्स्टाग्राम क्रिएटर्स आणि इन्फ्युएन्सर्सना होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. अद्याप कंपनीने या पेड फिचरसाठी अधिकृत धोरण जाहीर केले नाही.

    एका अहवालानुसार इन्स्टाग्राम सबस्क्रिप्शन इन एप ॲपल प्ले स्टोअरवर लिस्टेड आहे. यासाठी इन्स्टाग्रामने सबस्क्रिप्शन कॅटेगरीही तयार केली आहे. सध्या तिथे ८९ रुपये दरमहा चार्ज असे दिसते आहे. युझर्ससाठी जेव्हा हे ॲप आणण्यात येईल, तेव्हा त्यात बदल झालेले पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

    सोशल मीडियावर यापूर्वीही आल्या होत्या बातम्या
    काही जणांनी याबाबत यापूर्वीही ट्विट केले होते. इन्स्टाग्राम सबस्क्राईब बटनाची टेस्ट करत असल्याचे या ट्विटमध्ये लिहिलेले होते. हे बटन क्रिएटर्सच्या प्रोफाईवलर दिसेल. कंटेन्ट क्रिएटरला सबस्क्रिप्शन किती असावे, हे ठरवण्याचा ऑप्शनही असणार आहे.  सबस्क्रिप्शन घेतल्यानंतरच यूझर्स आपल्या आवडीच्या क्रिएटर्सचा कन्टेन्ट बघू शकेल. जो इन्स्टाग्राम यूझर ८९ रुपयांचे सबस्क्रिप्शन घेऊल, त्याला एक बॅच नंबर मिळेल, त्या नंबरने सबस्क्रिप्शन यूझरची ओळख असेल. यामुळे क्रिएटर्सना त्यांना होणारे उत्पन्न आणि मेंबरशिप एक्पायरीची तारीखही कळू शकणार आहे.