अमरावती हिंसाचार प्रकरणाची उच्च न्यायालयामार्फत चौकशी करा अनिल बोंडे

    अमरावती (Amravati): हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची भाजप नेते अनिल बोंडे यांनी मागणी केली आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे.”हिंसाचाराबाबत सरकारच्या चौकशीतून काहीच समोर येणार नाही, हिंसाचाराबाबत सरकार लपवा छपवी करत आहे.

    सरकारच्या चौकशीवर विश्वास नाही” असे अनेक आरोप करत अनिल बोंडेंनी राज्य सरकारच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.हिंसाचार प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत करावी अशी बोंडेंची मागणी आहे.