हॅट्ट्रिक करणाऱ्या आयर्नमॅनचा मुलगाही झाला आयर्नमॅन

गबेरा - साऊथ आफ्रिका येथे २१ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत बारामतीचा युवा सुपुत्र अभिषेक सतिश ननवरे याने जागतीक  आयर्नमॅन स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. सलग तीन वेळा आयर्नमॅन स्पर्धा जिंकणाऱ्या सतीश ननवरे या वडिलांच्या यशानंतर अभिषेक ने हे दैदिप्यमान यश मिळवले आहे.

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : गबेरा – साऊथ आफ्रिका येथे २१ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत (Ironman Competition) बारामतीचा युवा सुपुत्र अभिषेक सतिश ननवरे याने जागतीक  आयर्नमॅन स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. सलग तीन वेळा आयर्नमॅन स्पर्धा जिंकणाऱ्या सतीश ननवरे या वडिलांच्या यशानंतर अभिषेक ने हे दैदिप्यमान यश मिळवले आहे. निर्धारित १६ तासाचे  अंतर अभिषेकने १३ तास ३३ मिनीटात पूर्ण करून नवा विक्रम केला.

  आयर्नमॅन ही ट्रायथॉलॉन प्रकारची स्पर्धा होती, त्यामध्ये  ३.८ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग, ४२.२ किमी रनिंग हे  टास्क सलग १६ तासांच्या आत पूर्ण करणे अपेक्षित असते. अभिषेकने हे अंतर १३ तास ३३ मिनिट व १४ सेकंदात पुर्ण करुन नव्या विक्रमाची नोंद केली.

  ग्रामीण भागातील सर्वात युवा आयर्नमॅन

  जगभरातून हजारो क्रीडा स्पर्धक  या खडतर स्पर्धेसाठी सराव करीत असतात.  जगातील सर्वात  अवघड आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. या स्पर्धेसाठी अभिषेक गेली दीड वर्षे दिवसातून ८ ते ९ तास आयर्नमॅन सतिश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव होता. आर्यनमॅन ही स्पर्धा पूर्ण केल्यानंतर अभिषेक हा भारतातील ग्रामीण भागातील सर्वात युवा आयर्नमॅन गणला जाणार आहे.

  अभिषेकचे आयर्नमॅन बनल्यामुळे एक बाप आणि प्रामुख्याने प्रशिक्षक म्हणून अश्या दुहेरी भूमिकेत माझा ऊर आनंदाने भरून आला आहे. अभिषेक करत असलेल्या परिश्रमामुळे त्याच्या यशाबद्दल खात्री होती मात्र प्रत्यक्षात यश प्राप्त झाल्यानंतरचा आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. अभिषेकच्या यशात त्याचे व्यक्तिगत कष्ट, ध्यास यासोबतच अभिषेकच्या पाठीमागे हिमालया एवढ्या असणाऱ्या सर्व हितचिंतकांच्या शुभेच्छा, सदिच्छा आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेले आर्थिक पाठबळ, स्पॉन्सरशिप यांचा देखील महत्वाचा वाटा आहे.

  – सतिश ननवरे, आयर्नमॅन.