डोंबिवलीत पुन्हा फेरीवाल्याकडून आयटी इंजिनिअरला मारहाण

परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. एक दिवसापूर्वी तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशन मधबन टॉकीज परिसरात गेला होता. तो त्याठिकाणाहून जात असताना एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीर याने त्याला जाब विचारला.

    डोंबिवली : डोंबिवलीत पुन्हा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आहे. आयटी इंजिनिअर असलेल्या एका तरुणाला फेरीवाल्याचा धक्का लागला. तरुणाने त्या फेरीवाल्याला जाब विचारला. या गोष्टीचा राग मनात धरुन चार ते पाच फेरीवाल्यांनी मिळून या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मी इतका टक्स भरतो माझ्या शहरात माझ्यासाठी फूटपाथ चालायला मिळत नाही. जो फूटपाथ आहे. त्यावर फेरीवाले बसतात. मला त्याचा फायदा काय. महापालिका काय करते. असा संतप्त सवाल सुधीर पगारे या तरुणाने केला आहे. तर या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तरुणाची तक्रार दाखल केली असून मराहाण करणाऱ्या फेरीवाल्याचा पोलीस शोध घेत आहेत. नव्या केडीएमसी आयुक्त यांनी फेरीवाला आणि रस्त्यांसंदर्भात वॉकेबल सिटी या संकल्पनेची पोलखोल झाली आहे.

    परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. एक दिवसापूर्वी तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशन मधबन टॉकीज परिसरात गेला होता. तो त्याठिकाणाहून जात असताना एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीर याने त्याला जाब विचारला. या जाब विचारल्याच्या रागात चार ते पाच फेरीवाल्यानी सुधीर याला पकडून त्याला मारहाण केली. सुधीर पगारे याचे म्हणणे आहे की, मी डोंबिवलीचा सुशिक्षित सभ्य नागरीक आहे. मी महापालिकेला टॅक्स भरतो. परंतू चालण्यासाठी मला रस्ता मोकळा नाही. फूटपाथ नाही. जो रस्ता आहे. त्यावर फेरीवाले बसले आहेत. जेव्हा मी त्यांची तक्रार करतो. त्यांच्याकडून मला मारहाण केली जाते. ही कशी गुंडागर्दी आहे. महापालिका काय करते. असा संतप्त सवाल सुधीर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात रामनगर पोलीस, ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन गीते सांगितले या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांचा शोध सुरु आहे त्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल.

    आता प्रश्न येतोय महापालिकेचा केडीएमसीच्या नव्या आयुक्त डा इंदूराणी जाखड यांनी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी शहराला वॉकेबल सिटी करण्यासाठी जे काही करता येईल. ते आम्ही करणार असा दावा केला होता. परंतू त्यांच्या या दाव्याची फाेलखोल झाली आहे. फेरीवाल्यांसमोर महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. राजकीय पक्षांनी देखील आपली तलवार म्यान केली आहे. हेच या घटनेतून उघड झाले आहे.