घरात कासव ठेवणं पडलं महागात; बाप-लेकाला पोलिसांच्या बेड्या

घरात कासव ठेवणं बापलेकाला चांगलंच भोवलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने झाडाझडती घेतल्यानंतर घरात जिवंत कासव आणि वन्यप्राण्यांची हाडे पोलिसांना गवसली. वनविभागाने बाप-लेकास अटक केली आहे.

    चंद्रपूर (Chandrapur) : घरात कासव ठेवणं बापलेकाला चांगलंच भोवलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने झाडाझडती घेतल्यानंतर घरात जिवंत कासव आणि वन्यप्राण्यांची हाडे पोलिसांना गवसली. वनविभागाने बाप-लेकास अटक केली आहे.

    मुरलीधर हरबाजी गायकवाड, अतुल मुरलीधर गायकवाड अशी बापलेक आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या शिवणी येथे करण्यात आली.
    चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शिवणी वनपरिक्षेत्रातील शिवणी येथील गायकवाड यांच्या घरात कासव असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली.

    माहितीच्या आधारावर वनविभागाने घराची झाडाझडती घेतली असता, घरात जिवंत कासव आढळून आलं. सोबतच वन्यप्राण्यांचे हाडे आढळून आलीत. सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. तुपे, विकास तुमराम यांनी केली.