जे. जे. मगदूम आभियांत्रिकीचा रेड हॅट ऍकॅडमीशी करार

जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने विद्यार्थ्यांच्या आभियांत्रिकी तंत्रज्ञान व करियर करण्यासाठी आवश्यक सर्वंकष विद्यार्थी विकासासाठी रेड हॅट या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेशी सामंजस्य करार केला असल्याची माहिती चेअरमन डॉ. विजय मगदूम यांनी दिली.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने विद्यार्थ्यांच्या आभियांत्रिकी तंत्रज्ञान व करियर करण्यासाठी आवश्यक सर्वंकष विद्यार्थी विकासासाठी रेड हॅट या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेशी सामंजस्य करार केला असल्याची माहिती चेअरमन डॉ. विजय मगदूम यांनी दिली.

    या करारामुळे अभियांत्रिकी पदवीबरोबरच सॉफ्ट स्किल, सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे ज्ञान, एन्टर्नशीप इन क्लाऊड कॉम्प्युटिंग, रेडहॅट लीनक्स इत्यादी, प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजेसची माहिती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे करियर होण्यासाठी मागणीनुसार अध्ययन, प्रमाणीकरण, शैक्षणिक वर्ग, असाइनमेंट व रिसोर्स वेब बेस्ट प्लॅटफॉर्म चालू ट्रेंड /मागणीनुसार सक्षम बनवण्याची संधी इंटर्नशीपची संधी कौशल्यविकास कार्यक्रम व तयारी, रेड हॅट प्रयोगशाळेचा विकास त्याबरोबर विद्यार्थी सक्षमीकरणासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरेल व ऍकॅडमीचा जागतिक पातळीवर 163 देशांमधील कामाचा अनुभव फायदेशीर होईल, असे मत महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी व्यक्त केले.

    या कराराअंतर्गत, आवश्यक ई-बुक्स प्रिंटेड किंवा ऑनलाईन स्टडी मटेरियल, सुलभ प्रयोगशाळांचे बहुपर्यायी, नोकरीच्या संधी, भागीदारी संस्था व ग्राहक नेटवर्कद्वारे इत्यंभूत माहिती घेणे इत्यादी फायदे अंतर्भूत असून, विद्यार्थी करियरमध्ये रेड हॅट अकॅडेमीचा सहभाग मोठा असेल असे मत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. शुभांगी पाटील यांनी व्यक्त केले.

    रेड हॅट अकॅडमी व डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या संयुक्तपणे राबवत असलेल्या या सर्व उपक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रदीप चौगुले काम पाहत आहेत. या सामंजस्य करार प्रक्रियेदरम्यान ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांच्या हस्ते ऍकॅडमीच्या संचालिका कविता पाटील यांचा सत्कार करण्यात आला.