sayaka kanda

सयाका कांडा (Japanese Actress Sayaka Kanda) होक्काईडो बेटावरील हॉटेलमधील २२ व्या मजल्यावर वास्तव्यास होती. तिथूनच खाली पडून तिचा मृत्यू झाला (Sayaka Kanda Death) आहे. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाही.

    जपानी अभिनेत्री सयाका कांडांचा ( Japanese Actress Sayaka Kanda) होक्काईडो बेटावरील एका हॉटेलमधील २२ व्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू (Sayaka Kanda Death Aftre Falling From 22nd Floor) झाला आहे. हॉटेलच्या बाहेर १८ डिसेंबरला रक्तबंबाळ अवस्थेत ३५ वर्षीय सयाकाचा मृतदेह आढळला. सयाकाच्या मृत्यूनंतर तिच्या चाहत्यांना प्रचंड दु:ख झालं आहे.

    सयाका हॉटेलमधील २२ व्या मजल्यावर वास्तव्यास होती. तिथूनच खाली पडून तिचा मृत्यू झाला आहे. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाही.

    सयाका एक जपानी अभिनेत्री आणि गायक होती. अभिनेता Masaki Kanda आणि पॉप गायक Seiko Matsuda यांची ती एकुलती एक मुलगी होती. सयाकाने Disney च्या Frozen चित्रपटाच्या सीरिजमध्ये डबिंग केलं होतं, ज्यामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

    पोलिसांनी सध्या तिच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. सध्या ही आत्महत्या असल्याचं ग्राह्य धरत तपास सुरु आहे. मात्र यामागे घातपात असल्याची शक्यताही नाकारण्यात आलेली नाही.