१५ दिवस झाले यांना सरकार स्थापन करता आले नाही – जयंत पाटील

महाराष्ट्रामध्ये पूर आणि अतिवृष्टी चे संकट यायला लागले आहेत. सरकारमध्ये फक्त २ जण आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी सरकार स्थापन करून योग्य त्या पद्धतीने काम सुरू करायला पाहिजे होते असे ते म्हणाले.

    हिंगोली : एकदा जनतेतून निवडून दिलं. आधी नगरसेवकातून, परत जनतेतून हे जे प्रकार चालू आहे.आणि अनेक ठिकाणी मागचा अनुभव हा आहे की नगराध्यक्ष एका बाजूचा आणि खालची पार्टी विरोधी बाजूची सगळ्या नगरपालिकेची ३ घेराव असतात.त् यामुळे हा निर्णय चुकीचा आहे. या सरकारने हा निर्णय घेणं उचित आहे असे आम्हाला वाटत नाही. लोकांपर्यंत जायला १५ दिवस झाले यांना सरकार स्थापन करता आले नाही. १५ दिवस झाल्या नंतर देखील त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

    वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर रात्री साडेनऊच्या जयंत पाटील सुमारास दाखल झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांसोबत त्यांची संवाद साधला. आमदार संतोष बांगर यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांना दाखवले. दरम्यान बोलत असताना जयंत पाटलांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र केलं आहे. महाराष्ट्रामध्ये पूर आणि अतिवृष्टी चे संकट यायला लागले आहेत. सरकारमध्ये फक्त २ जण आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी सरकार स्थापन करून योग्य त्या पद्धतीने काम सुरू करायला पाहिजे होते. दोघे एकच आहेत. कोणत्या गोष्टी मध्ये सरकार अडकले आहेत हे नेमके समजत नाही आहे. अशीही टीका त्यांनी केली.