जयसिंगपूर नगरपालिका पश्चिम विभागात ७० वी; ओडीएफ प्लस मानांकन

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात २५ ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये पश्चिम विभागातून जयसिंगपूर नगरपालिकेने ७० वा क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पालिकेला ओडीएफ प्लस हे प्रमाणपत्र मिळाले आहे.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात २५ ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये पश्चिम विभागातून जयसिंगपूर नगरपालिकेने (Jaysingpur Municipal Council) ७० वा क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पालिकेला ओडीएफ प्लस हे प्रमाणपत्र मिळाले आहे. या कामगिरीमुळे नगरपालिका पदाधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.

    स्वच्छ भारत अभियान ही स्वच्छतेच्या बाबतीत आघाडीवर असलेली योजना आहे. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या. जयसिंगपूर नगरपालिकेनेही यामध्ये घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा संकलन, विलगीकरण, बायोमेडिकल कचऱ्यावर प्रक्रिया, कचराकुंड्या, प्लॅस्टिकबंदी, रस्त्यांची स्वच्छता व जनजागृतीच्या माध्यमातून स्पर्धांचे आयोजन आदी प्रमुख बाबींचा समावेश होता. त्याअंतर्गत पालिकेला हे मानांकन मिळाले.

    या अभियानासाठी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, आरोग्य सभापती रेखा देशमुख, मुख्याधिकारी टिना गवळी, स्वच्छता निरीक्षक संदीप कांबळे, प्रकल्प समन्वयक प्रताप भोसले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान लाभले.