jyotiraditya sindhiya viral video

आज सकाळीच ज्योतिरादित्य शिंदे(Jyotiraditya Scindia) यांचा एक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये ज्योतिरादित्य शिंदे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत धावत सुटल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे धावताना त्यांचा एक पदाधिकारी तोल जाऊन खाली पडला, मात्र तरीदेखील शिंदे मात्र धावतच राहिले.

    केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे(Jyotiraditya Scindia) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video Of Jyotiraditya Scindia)ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील(Jyotiraditya Running On Cricket Stadium With Workers) धावत असल्याचे दिसत आहे. नेटिझन्सकडून या व्हिडिओवर हटके कमेंट्स येऊ लागल्या आहेत.

    आज सकाळीच ज्योतिरादित्य शिंदे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ज्योतिरादित्य शिंदे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत धावत सुटल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे धावताना त्यांचा एक पदाधिकारी तोल जाऊन खाली पडला, मात्र तरीदेखील शिंदे मात्र धावतच राहिले. या व्हिडिओबद्दलची माहिती अखेर समोर आली आहे.

    ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेर दौऱ्यावर असतानाचा हा व्हिडिओ आहे. शिंदे ग्वाल्हेर इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी ग्वाल्हेरमध्ये आले होते. स्टेडियमच्या कामाची पाहणी करताना ते स्टेडियमच्या अधिकाऱ्यांसोबत आणि भाजपा कार्यकर्त्यांसोबत क्रिकेटदेखील खेळले. यावेळी सर्वांसोबत त्यांनी धावण्याचा देखील सराव केला. यावेळी काढण्यात आलेला हा व्हिडिओ आहे.