कालीचरण आता महंत नरसिंहानंदांनी केला महात्मा गांधींचा अपमान

संत कालीचरण महाराजानंतर आता गाजियाबादस्थित डासना मंदिराचे महंत नरसिंहदानंद सरस्वती गिरी यांनी महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधींना ‘घाण’ संबोधले. नरसिंहानंदाने संत कालीचरणवरील अटकेची कारवाईही चुकीची ठरविली. त्यांनी हरिद्वार येथून एक व्हीडिओ जाहीर केला( Kalicharan was now insulted by Mahant Narasimhananda to Mahatma Gandhi).

    हरिद्वार : संत कालीचरण महाराजानंतर आता गाजियाबादस्थित डासना मंदिराचे महंत नरसिंहदानंद सरस्वती गिरी यांनी महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधींना ‘घाण’ संबोधले. नरसिंहानंदाने संत कालीचरणवरील अटकेची कारवाईही चुकीची ठरविली. त्यांनी हरिद्वार येथून एक व्हीडिओ जाहीर केला( Kalicharan was now insulted by Mahant Narasimhananda to Mahatma Gandhi).

    गांधींबाबत बोलायचे नाही, असे आम्ही ठरविले होते, मात्र तो प्रसंग आमच्यावर ओढवलाच. गांधी नावाच्या घाणीमुळे कालीचरण महाराजांना अटक करण्यात आली. त्यांचा मा काली आणि महादेव समूळ नाश करतील, असे सांगतानाच नरसिंहानंद यांनी काँग्रेस सरकारने अत्यंत निर्लज्ज काम केल्याचे या व्हीडिओत सांगितले.

    उल्लेखनीय आहे की, नरसिंहानंद गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे महंत आहेत. 6 डिसेंबर रोजी त्यांनी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी यांचे धर्मांतरण केले होते. यासोबतच, रिझवी यांना जितेंद्र नारायण सिंह त्यागी हे नावही दिले होते. दुसरीकडे, रायपूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका धर्म संसदेत संत कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींबाबत अपशब्दांचा वापर केला होता.